उद्धव ठाकरे- शरद पवार यांची ‘सिल्वर ओक’वर दोन तास चर्चा; काँग्रेसनेही घेतला १९ लोकसभा मतदारसंघाचा आढावा

आज महाविकास आघाडीचे जागावाटप ठरणार

मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. ५ मार्च राेजी उद्धव ठाकरेंनी आपल्या वाट्याच्या २३ जागांवरील उमेदवारांची यादी घेऊन शरद पवार यांची ‘सिल्वर ओक’वर भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे दीड ते दोन तास चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या उमेदवारांबाबतही पवार ठाकरेंशी बोलले. दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांनी दिवसभर स्थानिक नेत्यांकडून १९ लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा केली. आता ६ मार्च रोजी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून जागावाटप अंतिम करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

वंचितच्या २७ पैकी १० मतदारसंघावर काँग्रेसचा दावा
Congress claims 10 out of 27 deprived seats

वंचित बहुजन आघाडीने २८ फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीच्या बैठकीत २७ लोकसभा मतदारसंघाची यादी दिली होती. मात्र, वंचितच्या या २७ पैकी १० मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. मंगळवारी या जागांचाही काँग्रेसने आढावा घेतला. त्यामुळे वंचितचा महाविकास आघाडीत समावेशाबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

 

छत्रपती संभाजीनगरचा मतदारसंघ भाजपच लढवणार
BJP to contest Chhatrapati Sambhajinagar seat

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या प्रचाराचा नारळ ५ मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जाहीर सभांनी फोडण्यात आला. जळगाव, छत्रपती संभाजीनगर येथे शाह यांनी जाहीर सभा घेतल्या. तर अकोल्यात निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन विदर्भातील सहा लोकसभा मतदारसंघातील तयारीचा आढावा घेतला. संभाजीनगरातून ‘मजलीस’ला म्हणजेच एमआयएमला उखडून फेका, असे आवाहन करुन लोकसभा निवडणूक प्रखर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवण्याचे संकेतही त्यांनी दिले. तसेच छत्रपती संभाजीनगरचा मतदारसंघ भाजपच लढवणार असल्याचे संकेतही शाह यांच्या सभेतून मिळाले आहेत.
https://missionpolitics.com/amit-shah-urges-maharashtra-bjp-to-secure-all-48-lok-sabha-seats/

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics