Vijay Shivtare will rebel against Ajit Dada in Baramati
पुणे : शिंदेसेनच्या सहा खासदारांचे तिकिट कापून त्यांच्या उमेदवारांची संख्या कमी करण्यासाठी भाजपकडून दबाव वाढत असताना आता शिंदेसेनेच्या एका नेत्याने महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे. पुरंदरचे माजी आमदार व शिंदेसेनेचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून नमो विचार मंच या बॅनरखाली अपक्ष निवडणूक लढवण्याची अधिकृत घोषणा १३ मार्च रोजी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
यावर्षी महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक चुरशीची लढत होणार आहे ती बारामती मतदारसंघात Baramati Loksabha. याचे कारण म्हणजे गेली अनेक वर्षे पवार घराण्याचे वर्चस्व असलेल्या या बारामती मतदारसंघात यंदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होऊ घातली आहे. शरद पवारांशी (Sharad Pawar) बंड करुन भाजपशी हातमिळवणी करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार IAjit Pawar) यांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar) यांना महायुतीकडून बारामतीची उमेदवारी जाहीर केली आहे. तर शरद पवारांच्या कन्या व विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीच्या उमेदवार असतील. नणंद – भावजय यांच्यातील या लढतीकडे देशाचे लक्ष असेल. भाजपने गेल्या दोन निवडणुकात जोर लावून अमेठीप्रमाणे बारामतीही ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना अपयश आले. आता भाजपने पवार घराण्यातच फूट पाडून हे मनसुबे यशस्वी करण्याचे डावपेच आखले आहेत. त्यामुळे शरद पवार व सुप्रिया सुळे (Supriya Sule) अडचणीत आल्या आहेत.
Vijay Shivtare will rebel against Ajit Dada in Baramati
अजित पवारांनाही ‘विजय’ सोपा नाही
आजवर बारामती लोकसभा Baramati Loksabha निवडणुकीचे व्यवस्थापन अजित पवार (Ajit Pawar) चोखपणे पार पाडत होते. मात्र आता त्यांनी काकांविरोधात बंड करुन आपल्याच पत्नीला मैदानात उतरवले आहे. अजितदादांमुळे बारामतीत महायुतीचा उमेदवार सहज विजयी होईल, अशी आशा भाजपला वाटत आहे. मात्र या लढतीत आता नवा टिवस्ट आला आहे. पुरंदरचे माजी शिवसेना आमदार विजयबापू शिवतारे (Vijay Shivtare) यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्याविरोधात मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. इंदापूरचे माजी आमदार व भाजप नेते हर्षवर्धन पाटील, भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या मदतीने अजितदादा व सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्याचा निर्धार शिवतारे यांनी बोलून दाखवला. Ajit Pawar given threat to Vijay Shivtare,
१३ मार्च रोजी त्यांनी पुरंदरमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा बंडखोरीचा विचार बोलून दाखवला. त्याला सर्व पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला. आता ही निवडणूक ‘नमो विचार मंच’ या बॅनरखाली आपण लढवणार असल्याचे शिवतारे (Vijay Shivtare) यांनी सांगितले.
Vijay Shivtare will rebel against Ajit Dada in Baramati
बारामतीत पवारविरोधी साडेपाच लाख मते
बारामतीत Baramati Loksabha पवार गटाला आतापर्यंत ६ लाख ८० हजार मते मिळत आली. मात्र ५ लाख ८३ हजार मते त्यांच्याविरोधात पडत होती. गेल्या दोन निवडणुकीत महादेव जानकर, कांचन कूल हे पवारविरोधात उमेदवार होते, त्यांना ही विरोधी मते पडत आली. मात्र यावेळी पवार विरुद्ध पवार असाच सामना आहे. मग पवारविरोधी मतांनी मतदान कुणाला करायचे? हा प्रश्न आहे. गेली ४० ते ५० वर्षे बारामतीची Baramati Loksabha सत्ता मिळूनही पवारांनी शहर वगळता इतर भागाचा विकास केला नाही, अशी लोकांची भावना आहे. त्यांच्या मताला योग्य स्थान मिळवून देण्यासाठी आपण ही निवडणूक लढवणार असल्याचे शिवतारे (Vijay Shivtare) यांनी सांगितले.
महायुतीत बंडाची ठिणगी
आमची लढाई सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात असल्याचे शिवतारे सांगत असले तरी त्यांच्या बंडामुळे सुनेत्रा अजित पवार यांनाच मोठा फटका बसणार आहे. याचे कारण म्हणजे सुनेत्रा या भाजप, शिंदेसेना व अजितदादांच राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाच्या संयुक्त उमेदवार आहेत. त्यात शिवतारे हे शिंदेसेनेचे उमेदवार असल्याने त्यांची मते सुनेत्रा यांना मिळणे अपेक्षित होते, मात्र ती शिवतारे (Vijay Shivtare) यांना मिळाल्यास होणारे नुकसान अजितदादा गटाचेच असेल.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी जाहीर चॅलेंज देऊन शिवतारे यांचा पराभव केला होता. त्याचा राग विजयबापूंना आहे. तीच गत इंदापूरमधील भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची आहे. अजितदादांचे समर्थक दत्तात्रय भरणे यांनी सलग दोनदा हर्षवर्धन यांचा पराभव केला. त्यामुळे त्यांच्याही मनात अजितदादांविषयी राग आहे. भोरचे संग्राम थोपटे हेही पवारविरोधक म्हणून ओळखले जातात. पवारांच्या हक्काच्या ६ लाख ८० हजार मतांचे यंदा विभाजन होईल. तर पवारविरोधी ५ लाख ८३ हजार मतांच्या जोरावर व हर्षवर्धन पाटील, थोपटे यांच्या मदतीने आपण विजयी होऊ शकतो, असे शिवतारे यांना वाटते.
Vijay Shivtare will rebel against Ajit Dada in Baramati
नमो विचारमंच कशासाठी?
‘तु्म्ही शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आहात. मग नमो विचार मंच या बॅनरखाली निवडणूक का लढवणार?’ या प्रश्नावर शिवतारे (Vijay Shivtare) म्हणाले, ‘नरेंद्र मोदी यांना मानणारा देशात मोठा वर्ग आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व मी स्वत: त्यांना मानतो. स्वाभिमानी राजकारण कसे करायचे हे त्यांनी आम्हाला शिकवले आहे. माझी ही लढाई बारामतीकरांच्या स्वाभिमानाची लढाई आहे म्हणून मी या नावाने निवडणूक लढवणार आहे.’
‘एकनाथ शिंदेंनी सांगितले तर माघार घेणार का?’ या प्रश्नावर शिवतारे (Vijay Shivtare) म्हणाले, ‘मी निवडणूक लढवणार हे आता १००१ टक्के निश्चित झाले आहे. मी अद्याप कोणाही नेत्याशी चर्चा केलेली नाही. जनतेच्या मागणीनुसार मी मैदानात उतरलो असून आता माघार घेणार नाही. कृपया करुन या लढाईला बंडखोरीचे नाव देऊ नका. कारण ही स्वाभिमानाची व लोकशाही टिकवण्याची लढाई आहे. त्यामुळे मी शिवसेना सोडण्याचेही कारच कारण नाही.’
राष्ट्रवादीकडून इशारा Warning from NCP
दोन दिवसांपूर्वी विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली होती. तसेच बारामतीत बंडखोरीचे संकेत दिले होते. ही टीका अजितदादा समर्थकांच्या खूप जिव्हारी लागली. कल्याणचे माजी खासदार आनंद परांजपे यांनी त्याला शिंदेगटाला प्रत्त्युत्तर दिले. ‘तुम्ही जर बारामतीत बंडाचा झेंडा हाती घेणार असाल तर आम्हीही कल्याणमध्ये (श्रीकांत शिंदेविरोधात) त्याचा वचपा काढू.’ राष्ट्रवादीचे दुसर प्रवक्ते अमोल मिटकरी यांनीही ‘अजितदादांविरोधात बेताल वक्तव्ये कदापिही खपवून घेतली जाणार नाहीत,’ असा इशारा दिला आहे. दरम्यान, या वादावर अद्याप एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.