Ashok Chavan Resigns Congress अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम; भाजपकडून राज्यसभेवर जाणार

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी १२ फेब्रुवारी रोजी अचानक पक्ष सदस्यत्वाचा व आमदारकीचा राजीनामा देऊन सर्वांना चकित केले. (Ashok Chavan Resigns Congress) आगामी दोन दिवसात आपण पुढील वाटचालीबाबत निर्णय घेणार असल्याचे ते सांगत आहेत. मात्र ते भाजपातच जाणार असल्याचे आता लपून राहिलेले नाही. (Ashok Chavan will joins BJP soon). १५ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगरात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची जाहीर सभा आहे, त्यात चव्हाणांचा भाजप प्रवेश होईल व भाजपतर्फे त्यांचा राज्यसभेवर (Ashok Chavan on Rajyasabha) पाठवले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
काँग्रेसने अशोक चव्हाणांना (Ashok Chavan) दोनदा मुख्यमंत्रिपद दिले. अनेकदा मंत्रिपदे, पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद अशी अनेक पदावर संधी दिली. मात्र आदर्श गृहनिर्माण घोटाळ्यात अडकल्यामुळे त्यांना २०११ मध्ये मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावे लागले होते. काँग्रेसच्या पडत्या काळातही २०१४ मध्ये महाराष्ट्रात या पक्षाचे दोनच खासदार निवडून आले होते, त्यात नांदेडमधून अशोक चव्हाण व हिंगोलीतून राजीव सातव यांचा समावेश होता.
चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय विधान परिषद आमदार अमरनाथ राजूरकर (MLC Amarnath Rajurkar) यांनीही पक्ष सदस्यत्वाचा व आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

अजून ११ ते १३ आमदार पक्ष सोडणार
(Another 11 to 13 MLAs will leave Congress)

अशोक चव्हाण यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे अजून ११ ते १३ आमदार टप्प्याटप्प्याने पक्ष सोडून भाजपात प्रवेश करतील, अशी शक्यता चव्हाणांच्या एका निकटवर्तीय नेत्याने व्यक्त केली. त्यात मराठवाडा, विदर्भातील सर्वाधिक आमदारांचा समावेश असेल. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेससमोर मोठे आव्हान निर्माण झालेले असेल.

अशोकरावांनी का सोडला पक्ष? (Why Ashok Chavan leaves Congress)

पक्ष सोडल्याचे पत्रकारांसमोर सांगताना अशोकरावांनी त्याची कारणे मात्र जाहीर केली नाहीत. मात्र त्यांच्या निकटवर्तीयांच्या माहितीनुसार, खालील कारणांमुळे चव्हाणांना हा निर्णय घ्यावा लागला.
१. आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळ्यातून (Adarsh Scam) क्लीन चिट मिळवण्यासाठी भाजपशी जवळीक आवश्यक.
२. काँग्रेसला फारसे भवितव्य दिसत नाही. सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहूल गांधींपर्यंत (Rahul Gandhi) पोहोचता येत नाही, प्रमुख नेत्यांचे म्हणणे त्या एेकून घेत नाहीत.
३. प्रदेश काँग्रेसची धुरा निष्ठावंतांना डावलून ‘आयात’ नाना पटोलेंकडे सोपवली. पटोलेंच्या कार्यपद्धतीवर अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार अशा अनेक जुन्या नेत्यांचे आक्षेप आहेत. मात्र पक्षनेतृत्व ते एेकायला तयार नाही.
४. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिका दिवसेंदिवस हिंदूविरोधी घेताना दिसत आहे. त्यामुळे हिंदूबहुल मतदारसंघात तोंड दाखवणे स्थानिक नेत्यांना जड जात आहे. याविषयी वारंवार सांगूनही नेतृत्वाच्या भूमिकेत फरक पडत नाही.
५. अशोक चव्हाणांना दोन मुली आहेत. त्याही राजकारणात नशिब आजमावू पाहात आहेत. जोपर्यंत अशोक चव्हाणांचे नांदेड जिल्ह्यात वलय व वजन आहे तोपर्यंत मुलींना राजकारणात सेटल करण्याचा त्यांचा मनोदय आहे. काँग्रेसमध्ये राहून हे करणे शक्य नसल्याने अखेर चव्हाणांना भाजपचा पर्याय निवडावा लागला.
भाजपला काय फायदा?
१. काँग्रेसचा बडा नेता गळाला लावून भाजपने मविआला लोकसभेच्या पूर्वीच मोठा झटका दिला आहे. अशोक चव्हाण यांच्या रुपाने भाजपला मराठवाडात एक मराठा चेहरा मिळाला आहे. ज्याचा पक्षाकडे अभाव होता.
२. अशोकरावांना राज्यसभेवर पाठवून त्यांचा उपयेाग मराठवाड्यात प्रचारासाठी करुन घेण्यावर भाजपचा भर असेल. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात चव्हाणांना मानणारा मोठा वर्ग आहे, तो चव्हाणांमार्फत आपल्याकडे खेचण्याची भाजपची रणनिती आहे.
३. नांदेड, हिंगोली, परभणी या तीन मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी अशोकराव यशस्वीपणे पार पाडू शकतात, अशी भाजपला गॅरंटी वाटते.

 

पक्षाने मला मोठे केले. मीही पक्षासाठी काही कमी केले नाही: अशोक चव्हाण

मी कॉंग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यत्वचा राजीनामा दिला आहे. वर्किंग कमिटी, प्राथमिक सदस्यात्वाचाही राजीनामा दिला आहे. मी कॉंग्र्मेसमध्ये होतो तोपर्यंत प्रमाणिकपणे काम केले. माझी कोणाबाबतही तक्रार नाही. मी सध्या काहीही ठरवले नाही. मला यासाठी थोडा वेळ लागेल. भाजपमध्ये जाण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. दोन दिवसांत राजकीय भूमिका जाहीर करणार.
कोणाची उणीदुणी मला काढायची नाहीत. जन्मापासून कॉंग्रसचे काम केले.आता अन्य पर्याय पाहायला हवेत असे वाटले म्हणून राजीनामा दिला. पक्षाने मला मोठे केले. मीही पक्षासाठी काही कमी केले नाही.
– अशोक चव्हाण

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics