सुप्रिया सुळे यांची अजितदादा यांच्यावर पहिल्यांदाच टीका; म्हणाल्या, तेव्हा शरद पवार यांच्यामागे दादा आणि माझ्यासारखी…
नी वयाच्या 38 व्या वर्षी बंड केलं. मी 60 व्या वर्षी बाजूला झालो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांचं नाव न घेता जोरदार टीका केली. अजितदादा यांच्या या टीकेचा शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला आहे. सुप्रिया सुळे यांनी अजितदादा यांच्यावर पहिल्यांदाच टीका केली आहे. शरद पवार हे घराणेशाहीमुळे मुख्यमंत्री झाले नाहीत, असा टोला सुप्रिया सुळे यांनी अजितदादा यांना लगावला आहे. सुप्रिया सुळे यांच्या या वाक्यातून अनेक अर्थ निघत असून त्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत.
खासदार सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली आहे. शरद पवार यांनी 38 व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याचे सत्य काय आहे ते शालिनाताई पाटील यांनी सविस्तरपणे मांडले होते. शरद पवार हे 38व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांच्यामागे माझ्या आणि दादांसारखी घराणेशाही नव्हती, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.
अमोल कोल्हे यांना निवडणुकीत पाडणार असल्याचा निर्धार अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. काहींची बोलण्याची पद्धत वेगळी असते. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार आहे तर त्यांचा उमेदवार असणारच, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.