193 बसस्थानके लवकरच होणार चकाचक; एसटी बसस्थानकांचा एमआयडीसी करणार विकास

बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत राज्यातील 193 बस स्थानकांचे सौंदर्यीकरण व सुशोभिकरण होणार आहे. यासाठी एमआयडीसी आणि एसटी महामंडळ यांच्यात 600 कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. राज्यभरात एसटीची 609 बसस्थानके आहेत. त्यापैकी सध्या 563 बसस्थानके कार्यरत आहेत. बसस्थानक परिसरातील खड्डे, पावसाळ्यात पाणी साचून होणारा चिखल यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागतो.

एसटी बसेसचे देखील नुकसान होते. यावर कायमचा उपाय म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आर्थिक मदत करावी, असे आवाहन सरकारने केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. यानुसार पहिल्या टप्यात एमआयडीसी 193 एसटी बसस्थानकांच्या कॉक्रिटीकरणासाठी 500 कोटी रुपये व रंगरंगोटी, किरकोळ दुरुस्ती करण्याची 100 कोटी रुपये खर्चाची निविदा प्रक्रिया राबविणार आहे. यातून लवकरच या सर्व बसस्थानकांचा कायापालट होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics