Sharad Pawar threatens MLA शरद पवार म्हणतात मला…!

‘अरे तू आमदार कोणामुळे झालास? तुला तिकिट कुणी दिले? तुझ्या उमेदवारी अर्जावर कोणाची सही होती? तुझ्या प्रचार सभेला कोण आले होते. त्यावेळी तुझ्यासाठी जे राबले, ज्यांनी तुला निवडून आणले त्यांनाच आज तू धमकावत आहेस? एकदा दम दिलास, आता बस्स. यापुढे जर तू राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दम दिलास तर बघ. शरद पवार म्हणतात मला. मी त्या मार्गाने जात नाही. मात्र जर कोणी तशी परिस्थिती निर्माणच केली तर मात्र मी त्याला सोडत नसतो.’

लोणावळा : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाली आहेत. त्यापैकी बहुतांश आमदार व पदाधिकारी अजित पवारांकडे गेल्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) अस्वस्थ झाले आहेत. वयाच्या ८३ व्या वर्षीही त्यांना उरलेला पक्ष टिकवण्यासाठी व मुलगी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विजयासाठी धडपड करावी लागत आहे. या वयातही तरुणाईला लाजवेल अशी जिद्द बाळगणारे शरद पवार कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारण्यासाठी पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. दुसरीकडे, सत्तेच्या मोहापायी अजितदादांसोबत गेलेले दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील नेतेही आता आपल्या एकेकाळच्या साहेबांवर टीका करुन दादांप्रती स्वामीनिष्ठा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच एक प्रयत्न करणारे दादागटाचे मावळचे आमदार सुनील शेळके (MLA Sunil Shelke) यांना मात्र शरद पवार यांनी नुकताच सज्जड दम दिला आहे. war-in-ncp-sharad-pawar-threatens-mla

त्याचे झाले असे की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ७ मार्च रोजी लोणावळा येथे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शरद पवारांची सभा म्हटलं की नेहमीच बऱ्यापैकी गर्दी असते. यावेळी मात्र समर्थकांची संख्या तितकीशी दिसली नाही. त्यामुळे शरद पवार यांनी आधी पदाधिकाऱ्यांना विचारणा केली तेव्हा दुसऱ्या गटाकडून दबाव येत असल्याची माहिती त्यांना कळाली. या मेळाव्यात अजित पवार गटाचे ३५० कार्यकर्ते शरद पवार गटात सामील झाले. त्यांना गट न बदलण्यासाठी व मेळाव्याला न जाण्यासाठी मावळचे दादा गटाचे आमदार सुनील शेळके फोन करुन धमकावत असल्याची माहिती माजी मंत्री मदन बाफना यांनी आपल्या भाषणात दिली. त्यामुळे शरद पवारांचा पारा चढला.

Sharad Pawar threatens MLA तू कुणामुळे आमदार झालास?

आमदार सुनील शेळके यांचा शरद पवार यांनी आपल्या भाषणात समाचार घेतला. ते म्हणाले, ‘अरे तू आमदार कोणामुळे झालास? तुला तिकिट कुणी दिले? तुझ्या उमेदवारी अर्जावर कोणाची सही होती? तुझ्या प्रचार सभेला कोण आले होते. त्यावेळी तुझ्यासाठी जे राबले, ज्यांनी तुला निवडून आणले त्यांनाच आज तू धमकावत आहेस? एकदा दम दिलास, आता बस्स. यापुढे जर तू राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दम दिलास तर बघ. शरद पवार म्हणतात मला. मी त्या मार्गाने जात नाही. मात्र जर कोणी तशी परिस्थिती निर्माणच केली तर मात्र मी त्याला सोडत नसतो.’ अशी इशारा वजा धमकी शरद पवारांनी आमदार शेळकेंना दिली. त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला.

war-in-ncp-sharad-pawar-threatens-mla

आमदार शेळकेंकडूनही प्रत्त्युत्तर

थेट शरद पवारांशी पंगा घेणारे आमदार सुनील शेळके यांनीही पत्रकार परिषद घेऊन प्रत्त्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘मी कुणालाही धमकावलेले नाही. आरोप करणाऱ्यांनी ८ दिवसात त्याचे पुरावे द्यावेत, किंवा मी ज्यांना कुणाला धमकावले त्यापैकी एकालाही समोर आणून उभे करावे. काही लोक पवारांना चुकीची माहिती देत आहेत. त्यांनीही खातरजमा न करता अशी भाषा वापरणे योग्य नाही. हे आरोप सिद्ध झाले नाही तर पवार साहेब खोटे बोलत असल्याचे मी जनतेत जाऊन सांगणार आहे,‘ असा इशारा शेळके यांनी दिला. एकूणच शेळकेंनी थेट शरद पवारांशी पंगा घेतल्यामुळे या विषय राज्यभर चर्चेचा ठरला आहे.

पवारांना हे शोभत नाही : फडणवीस

राष्ट्रवादीच्या दोन गटातील या वादात भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही उडी घेतली आहे. ‘शरद पवार मोठे नेते आहेत. एका साध्या आमदाराबद्दल त्यांनी अशी भाषा वापरणे योग्य नाही.’

पवारांना चिंता बारामतीची Pawar is worried about Baramati

शरद पवार यांच्यासारखा सुसंस्कृत नेता, नेहमी तोंड सांभाळून बोलणारा नेता आमदार शेळके यांच्यासारख्या एका साध्या आमदाराच्या धमक्यांवर इतके का चिडले? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, भाजपने अजित पवार यांना फोडून बारामतीत आव्हान उभे केल्यामुळे शरद पवारांसमोरील चिंता वाढल्या आहेत. त्यातच आपल्याच सुनबाई व अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उभे करण्याचे भाजपचे मनसुबे यशस्वी होत आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. केवळ बारामतीत पराभवाची त्यांना चिंता नाही तर पवार घराण्यातील फुटीचे शल्यही त्यांच्या मनात बोचत आहे. तत्कालिक फायद्यासाठी अजित पवारांनी घराण्याच्या एकीला जे नख लावले आहे त्याचा राग शरद पवारांच्या मनात आहे. याच मन:स्थितीतून त्यांनी सगळा राग आमदार शेळके यांच्यावर काढला असावा, असा राजकीय अर्थ काढला जात आहे.

पवार.. लढवैय्ये नेते Sharad Pawar.. Fighting leader

राजकारणात कितीही कोंडी झाली तरी त्यावर मात करण्याची जिद्द शरद पवार बाळगून असतात. २०१९ च्या निवडणुकीत साताऱ्यात उदयनराजे यांचा पराभव करुन त्यांनी ते सिद्ध करुन दाखवले आहे. यावेळी मात्र त्यांना घरातून आव्हान मिळाले आहे. वाढत्या वयात कोणत्याही सामान्य माणसाकडे  हे दु:ख सहन करण्याची ताकद राहात नाही. शरद पवारांसाठी मात्र पवार घराणे हे कुटुंब नाही तर संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष हे त्यांच्यासाठी कुटुंब आहे. भाजपविरोधी राजकारणात राष्ट्रीय स्तरावरील पक्षांच्याही त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे शरद पवार खचून जाणारे नाही. उलट उरल्या सुरल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर जिद्दीने उभे राहण्याची ताकद ८३ व्या वर्षीही त्यांच्यात आहे. म्हणूनच निवडणुकीत ते जिंकतील की हरतील हा विषय वेगळा, पण प्रतिस्पर्ध्यांनी घरात फूट पाडून उभ्या केलेल्या आव्हानांना तोंड मात्र ते देतील यात तीळमात्र शंका नाही.