uddhav-thackerays-masterstroke-shinde-vs-dighe-battle-in-kalyan
मुंबई : मुख्यमंत्रिपदाच्या लालसेने शिवसेना फोडणारे एकनाथ शिंदे Eknath Shinde व इतर बंडखोरांना आमदार येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत धडा शिकवण्याचा विडा उद्धव ठाकरे Udhav Thackeray व त्यांच्यासोबत राहिलेल्या निष्ठावान नेत्यांनी उचलला आहे. त्याची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र खासदार श्रीकांत शिंदे Shrikant Shinde यांच्या कल्याण या मतदारसंघापासून करण्याची रणनीती त्यांनी आखली आहे. ज्या आनंद दिघेंचे नाव घेऊन एकनाथ शिंदे ज्वलंत हिंदुत्वाचे व आपल्या बंडखोरीचे समर्थन करत आहेत त्याच दिघेंच्या पुतण्याला कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात लोकसभेची उमेदवारी देण्याचे ठाकरे यांनी ठरवले आहे. त्यामुळे शिंदे पिता-पूत्रांची चांगलीच अडचण होणार आहेत.
ज्या प्रमाणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray हे नाव शिवसेनेची ओळख आहे, त्याचप्रमाणे धर्मवीर आनंद दिघे या नावाशिवाय मुंबई- ठाण्यात शिवसेनेचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. ठाण्याचे जिल्हाप्रमुखपदावर अनेक वर्षे राहिलेल्या आनंद दिघे Anand Dighe यांची ‘प्रति शिवसेनाप्रमुख’ अशी ओळख होती. जनतेच्या सेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी खर्ची घातले. एकनाथ शिंदे, राजन विचारे यासारखी ठाण्यातील अनेक नेतेमंडळी त्यांच्याच तालमीत तयार झाली. काही वर्षांपूर्वी आनंद दिघे Anand Dighe यांचे निधन झाले, मात्र त्यांना मानणारा मोठा वर्ग आजही ठाणे, पालघर जिल्ह्यात आहे.
uddhav-thackerays-masterstroke-shinde-vs-dighe-battle-in-kalyan
मी आनंद दिघेंचा शिवसैनिक I am Anand Dighe’s Shiv Sainik
उद्धव ठाकरेंशी Udhav Thackeray बंड करुन एकनाथ शिंदेंनी Eknath Shinde भाजपच्या मदतीने शिवसेना फोडली. मुख्यमंत्रिपदही मिळवले. त्यावेळी आपल्या बंडाचे समर्थन करताना शिंदे यांनी मी आनंद दिघेंचा शिवसैनिक असल्याचे वारंवार सांगितले होते. हिंदुत्ववादी विचारांशी मी तडजोड करु शकत नाही, म्हणून काँग्रेससोबत गेलेल्या उद्धव ठाकरेंची Udhav Thackeray साथ सोडली असे ते सांगतात. मात्र त्याच आनंद दिघेंच्या परिवाराने बंडखोरी करणाऱ्या शिंदेंची साथ दिली नाही. ते ठाकरे परिवाराशीच एकनिष्ठ राहिले. म्हणूनच उद्धव ठाकरेंनी आता दिघेंचे पुतणे केदार यांना ठाण्याचे जिल्हाप्रमुख केले आहे.
कल्याणमध्ये शिंदे विरुद्ध भाजप संघर्ष टोकाला Shinde vs BJP conflict in Kalyan
कल्याण लोकसभा मतदारसंघात Kalyan loksabha constituency मुख्यमंत्र्यांचे पूत्र श्रीकांत शिंदे Shrikant Eknath Shinde हे खासदार आहेत. यावेळीही त्यांना उमेदवारी मिळणार यात शंका नाही. पण भाजपमधून त्यांच्या उमेदवारीला मोठा विरोध होत आहे. भाजपचे ज्येष्ठ मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कल्याण मतदारसंघ आपल्यालाच हवा, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे लावून धरली आहे. यातून सत्ताधारी भाजप व शिवसेनेत तणाव वाढला आहे. नुकतेच याच मतदारसंघातील उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड BJP MLA Ganpat Gaikwad यांनी शिंदेसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार केला. त्यामुळे दोन गटातील तणाव अधिकच वाढला. सुदैवाने महेश बचावले, मात्र हा रोष निवडणुकीत नक्कीच निघणार यात शंका नाही.
शिंदे विरुद्ध दिघे सामना रंगणार Shinde vs Dighe Fight in Kalyan
एकीकडे महायुतीत बेबनावाचे चित्र असताना आता उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात केदार दिघे Kedar Dighe यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे दिघे यांना मानणारा मोठा वर्ग शिंदेंकडून केदार यांच्याकडे परावर्तीत होईल. दुसरीकडे शिंदे पिता- पुत्रांवर नाराज असलेला भाजपमधील मोठा गटही केदार दिघे यांना मदत करु शकतो. किंवा भाजप एखादा बंडखोर उमेदवार उभे करुन महायुतीतीकडे जाणाऱ्या एकगठ्ठा मतांचे विभाजन होऊ शकते. या तिहेरी लढाईत केदार दिघे यांच्यासारखा नवखा उमेदवार सहज निवडून येऊ शकतो, असे आडाखे उद्धव सेनेने बांधलेले आहेत. ठाकरेंच्या या खेळीमुळे एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
मतदारसंघ बदलू शकतात श्रीकांत शिंदे Srikant Shinde may change constituencies
भाजपच्या तीव्र विरोधामुळे व केदार दिघेंच्या आव्हानामुळे श्रीकांत शिंदे कल्याणएेवजी ठाणे मतदारसंघातून Thane loksabha constituency, उमेदवारी अर्ज भरु शकतात, असाही एक तर्क लावला जात आहे. ठाणे व कल्याण हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडेच आहेत. ठाण्यात सध्या शिवसेनेचे राजन विचारेRajan vichare हे खासदार आहेत. ते उद्धव ठाकरेंसोबत आहेत. त्यामुळे महायुतीत या मतदारसंघ शिंदेसेनेला मिळू शकतो. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे Eknath Shinde चांगले वर्चस्व आहे. त्यामुळे कल्याणमध्ये धोका पत्कारण्यापेक्षा तो मतदारसंघ भाजपला देऊन श्रीकांत शिंदे Shrikant Shinde यांना ठाण्यातून उमेदवारी देण्याबाबतच्या पर्यायावरही शिंदे विचार करत आहेत. कल्याणच्या तुलनेत ठाण्यात शिंदेंना लढत सोपी जाऊ शकते.