Loksabha Election 2024 : हेमंत गोडसे यांचे तिकीट कापून नाशकात छगन भुजबळ लढणार

नाशिकमधील शिंदेसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे तिकीट कापून त्या जागी अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री व ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यासाठी पवार गट आग्रही झाला आहे. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता आहे

नाशिक : निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला तरी महाविकास आघाडी व महायुतीतील जागावाटपाचा संघर्ष अजून थांबलेला नाही. शिंदेसेनेचे विद्यमान खासदार असलेल्या काही मतदारसंघावर भाजप व अजित पवार ajit pawar गटाकडून दावे केले जात आहेत. त्यामुळे हा वाद वाढतच चालला आहे. हिंगोली मतदारसंघात शिंदेसेनेचे खासदार हेमंत पाटील यांच्या जागी भाजपचा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु आहेत. तर आता नाशिकमधील शिंदेसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे तिकीट कापून त्या जागी अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री व ओबीसींचे नेते छगन भुजबळ chhagan bhujbal यांना उमेदवारी देण्यासाठी पवार गट आग्रही झाला आहे. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता आहे.

दादा तडजोड करणार का? Will Ajit Dada compromise?

अजित पवार ajit pawarगटाला महायुती ७ जागा देण्याचे ठरले होते. त्यात बारामती ,शिरूर, सातारा ,धाराशिव ,रायगड, परभणी आणि नाशिक या जागांचा समावेश होता. मात्र आता त्यातही तडजोड करण्याची वेळ दादांवर आली आहे. बारामतीत पत्नी सुनेत्रा यांचा विजय सुकर करण्याठी अखेरच्या टप्प्यात देवेंद्र फडणवीस devendra fadanvis यांनी खेळी करत महादेव जानकर mahadev jankar यांना युतीच्या बाजूने वळवले. त्यांच्या मागे असलेल्या धनगर समाजाची मते बारामतीत सुनेत्रा पवारांनी मिळतील, अशी त्यामागे अटकळ आहे. मात्र त्याबदल्यात अजितदादांना आपल्याकडे असलेला परभणी मतदारसंघात जानकरांसाठी ‘त्याग’ करावा लागत आहे. सातारा मतदारसंघासाठी भाजपनेही प्रतिष्ठा पणाला लावली होती. उदयनराजे भोसले यांनी चार दिवस दिल्लीत तळ ठोकून आपली उमेदवारी पक्की करुन आणली. त्यामुळे अजित पवार गटाला साताऱ्यावरही पाणी सोडण्याची वेळ आली. हे नुकसान भरुन काढण्यासाठी दादांनी नाशिकवर दावा केला. तिथे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ chhagan bhujbal किंवा त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांना मैदानात उतरवण्याचे पक्षाचे नियोजन आहे.

https://missionpolitics.com/loksabha-election-shiv-sena-and-bjp-cut-their-mps-ticket-in-ramtek-and-solapur/

भाजपचाही दावा, पण नंतर माघार BJP also claimed, but later backed out

भाजपनेही नाशिकवर दावा केला होता. कारण या लोकसभा मतदारसंघातील ६ आमदारांपैकी तीन जण राष्ट्रवादीचे व ३ जण भाजपचे आहेत. शिंदेसेनेचा इथे एकही आमदार नाही, हा मुद्दा पुढे करुन हेमंत गोडसेंचे तिकीट कापण्याची रणनिती भाजपने आखली. तसेच भाजपच्या अंतर्गत अहवालात गोडसेंविरोधात अॅन्टी इन्कबन्सी असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कळवण्यात आले. त्यामुळे भाजप व अजित पवार गटात रस्सीखेच सुरु झाली. अखेर भुजबळांच्या नावावर जवळपास एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भुजबळ एकदा विजयी, दोनदा पराभूत Bhujbal wins once, loses twice

नाशिक लोकसभा मतदारसंघात २००९ मध्ये समीर छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी तेव्हा मनसेत असलेल्या हेमंत गोडसे यांचा २२ हजार मतांनी पराभव केला होता. मात्र नंतर २०१४ मध्ये गोडसे शिवसेनेत आले. त्यांनी छगन भुजबळ यांचा पावणे दोन लाख मतांनी पराभव केला होता. २०१९ मध्ये पुन्हा हेमंत गोडसे व समीर भुजबळ यांची लढत झाली. मात्र मोदी लाटेत गोडसेंनी भुजबळांचा पावणेतीन लाख मतांनी पराभव केला हाेता. दोनवेळच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आता स्वत: सिनियर भुजबळ मैदानात उतरवणार असल्याची चर्चा आहे.

शिंदेंचा एक शिलेदार अजितदादांनी पळवला Ajitdada steals one of Shinde’s leaders

पुणे जिल्ह्यातील शिरुर मतदारसंघ अजित पवारांसाठी सुटला आहे. तिथे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्याशी दादा गटाचा सामना होणार आहे. तर दुसरीकडे शिंदेसेनेेनेही या मतदारसंघावर दावा केला आहे. आता अमोल कोल्हेंशी दोन हात करण्यासाठी दादांकडे तगडा उमेदवार नाही. पण त्यांना ही जागा सोडायची नाही. त्यामुळे शिवसेनेचे माजी खासदार व आता शिंदेसेनेत असलेले आढळराव पाटील यांनी अजितदादांनी आपल्या पक्षात घेतले व शिरुरची उमेदवारी दिली. महायुतीतील ही तडजोड असल्याचे शिंदेसेनेतून सांगितले जात असले तरी शिंदेसेनेने एक तगडा उमेदवार पक्षातून गमावल्याची खंत मात्र व्यक्त होत आहे.
२००४ पर्यंत राष्ट्रवादीत असलेल्या आढळरावांनी नंतर शिवसेनेत प्रवेश केला. २००४, २००९ व २०१४ असे सलग तीन टर्म ते खासदारपदी निवडून आले होतेे. मात्र २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हेंनी त्यांचा ५० हजार मतांनी पराभव केला. या निवडणुकीतही प्रतिस्पर्धी उमेदवार तेच असतील, मात्र त्यांचे पक्ष वेगवेगळे असतील. दोन राष्ट्रवादीचे गटच परस्परांशी भिडणार आहेत.

२८ मार्चला होणार युतीची यादी जाहीर list of Mahayuti will be announced on March 28

जागावाटपाच्या वादातून तोडगा काढण्यासाठी मुंबईत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या सलग बैठका सुरु आहेत. २८ मार्च रोजी या चर्चांना अंतिम रुप देऊन महायुतीच्या उमेदवारांची एकत्रित यादी जाहीर केली जाणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. भाजपने आतापर्यंत आपले २३ उमेदवार जाहीर केले आहेत. अजितदादा गटाने बारामतीतून सुनेत्रा पवार, रायगडमधून सुनील तटकरे व शिरुरमधून आढळराव पाटील या तिघांचीच उमेदवार जाहीर केली. शिंदेसेनेकडून मात्र अजून एकही अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही.