December 13, 2024

शिंदेसेनेच्या एका खासदाराची विकेट पडली, आता उरले चार; भाजपनेही सोलापूरच्या खासदाराचे तिकीट कापले

उमरेडमधील काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना शिंदेसेनेत घेऊन रामटेकची उमेदवारी देण्यात आली.

Loksabha election- Shiv sena and BJP Cut their MP's Ticket in Ramtek and solapur काँग्रेसच्या राजू पारवेंना शिवसेनेत घेऊन दिले रामटेकचे तिकीट, सोलापुरातून भाजपची आमदार राम सातपुते यांना पसंती

मुंबई : महायुतीतील जागावाटपात सर्वात महत्त्वाचा अडसर ठरला होता तो शिंदेसेनेच्या ५ विद्यमान खासदारांच्या तिकीट कपातीचा. भाजपच्या हायकमांडने या निष्क्रिय खासदारांची यादीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या Eknath Shinde हाती देऊन त्यांना पुन्हा उमेदवारी न देण्याबाबत बजावले होते. पण शिंदे तयार नव्हते. अखेर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतरही भाजप निर्णयावर ठाम राहिल्याने शिंदेंना हा निर्णय स्वीकारावा लागला. त्याचे पडसाद रामटेकच्या Ramtek Loksabha election  तिकिट वाटपात दिसून आले. येथील विद्यमान खासदार कृपाल तुमाने Krupal Tumane यांना यावेळी उमेदवारी नाकारण्यात आली. त्याएेवजी काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे Congress MLA Raju Parwe in Shiv sena  यांना शिवसेनेत घेऊन एकनाथ शिंदे यांनी त्यांनाच रामटेकच्या मैदानात उतरवले आहे. आता भावना गवळी Bhawana Gavali (यवतमाळ), हेमंत पाटील Hemant Patil (हिंगोली), सदाशिव लोखंडे sadashiv Lokhande  (शिर्डी) व गजानन किर्तीकर Gajanan kiritikar (उत्तर पश्चिम मुंबई) या भाजपच्या ब्लॅकलिस्टमध्ये असलेल्या चार खासदारांबाबत शिंदे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वयाची ८० गाठलेली किर्तीकरांचाही पत्ता कट होणार आहे. इतर तीन खासदारांमध्येही अस्वस्थता आहे.

सोलापूरच्या स्वामींचा पत्ता कट BJP Rejected Jay Sidheshwar swami as a candidate

दुसरीकडे, भाजपनेही जातीच्या बनावट प्रमाणपत्रामुळे वादग्रस्त ठरलेले सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांना यंदा उमेदवारी नाकारली आहे. त्याएेवजी पक्षाचे माळशिरस येथील तरुण आमदार राम सातपुते यांना बढती देऊन लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे. MLA Ram Satpute is BJP’s news candidate in solapur.  त्यांचा सामना काँग्रेसच्या आमदार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत होईल.

भंडारा, गडचिरोलीत भाजपचा विद्यमान खासदारांवरच विश्वास

विदर्भातील अन्य दोन मतदारसंघात मात्र भाजपने विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी दिली.

भंडारा- गोंदियात खासदार सुनील मेंढे व गडचिरोलीत अशोक नेते यांना पुन्हा उमेदवारी बहाल करण्यात आली.

भाजपने आतापर्यंत २३ उमेदवार जाहीर केले आहेत. महायुतीतील इतर दोन मित्रपक्ष शिंदेसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी यांनी अजून उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केलेली नाही. आता धूलिवंदनानंतर हे दोन्ही पक्ष आपल्या उमेदवारांची घोषणा करतील, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.

चंद्रपूरमध्ये काँग्रेसची उमेदवारी धानोरकरांना, वडेट्टीवारांचा दावा पक्षाने फेटाळला

काँग्रेसनेही महाराष्ट्रातील उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. त्यात बहुचर्चित चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून दिवंगत खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा यांना उमेदवारी जाहीर केली. Congress declair pratibha Dhanorkar as a Loksabha candidate in Chandrapur  या मतदारसंघात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपली मुलगी शिवानी यांना उमेदवारी मिळण्यासाठी चांगलाच जोर लावला होता. मात्र मतदारांची सहानुभूती धानोरकर यांच्या बाजूने होती. त्यामुळे दोघांमध्ये रस्सीखेच होती. २०१९ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात फक्त चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा एकमेव खासदार निवडून आला होता, ते म्हणजे बाळू धानोरकर. आता त्यांच्याच पत्नीला उमेदवारी मिळण्यात ज्येष्ठ नेत्याकडून अडसर आणला जात असल्यामुळे कार्यकर्तेही नाराज होते. अखेर केंद्रीय निवडणूक समितीने वडेट्टीवार यांना तुम्ही स्वत:च लढा अशी ऑफर दिली होती. मात्र वडेट्टीवार यांनी ती नाकारली. त्यामुळे अखेर प्रतिभा धानोरकर यांच्या लढाईला यश आले व उमेदवारी माळ त्यांच्या गळ्यात पडली. आता चंद्रपूरमध्ये भाजपचे ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार व प्रतिभा धानोरकर यांच्यात चुरशीची निवडणूक होईल. Sudhir Mungantiwar V/s pratiha Dhanorkar in Chandrapur

अशा होतील लढती : नागपुरात गडकरी विरुद्ध ठाकरे

• काँग्रेसने २३ जानेवारी रोजी विदर्भातील चार लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली. त्यात नागपूरमधून आमदार विकास ठाकरे यांना भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari V/s MLA Vikas Thackeray यांच्याविरोधात मैदानात उतरण्यात आले.
• रामटेकमधून काँग्रेसने माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांना तिकीट दिले. त्यांचा सामना काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या आमदार राजू पारवे यांच्याशी होईल.
• भंडाऱ्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नकार दिल्यामुळे काँग्रेसने डॉ. प्रशांत पडोळे यांना तिकीट दिले. त्यांची लढाई भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांच्याशी होईल.
• गडचिरोली या आदिवासीबहुल मतदारसंघात काँग्रेसने ज्येष्ठ गांधीवादी नेते डॉ. नामदेव किरसन यांना मैदानात उतरवले आहे. त्यांचा सामना भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते यांच्याशी होईल.

महिनाभरात काँग्रेसचा दुसरा आमदार भाजपच्या गळाला Second Congress MLA in BJP within a month

महिनाभरापूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण Ashok chavan यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला होता. दुसऱ्याच दिवशी त्यांनी भाजपने राज्यसभेवर संधी दिली. आता त्यांच्यापाठोपाठ विदर्भातील उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे MLA Raju Parwe यांनीही विधानसभा सदस्यत्वचा राजीनामा देऊन शिंदेसेनेत प्रवेश केला. लगोलग त्यांना रामटेकची उमेदवारी देण्यात आली.

About The Author