Satara Loksabha- Udyan Raje v/s Pruthviraj chavan battle posiible
सातारा : यंदाची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात अतिशय चुरशीची व रंगतदार बनली आहे. सातारा लोकसभा Satara Loksabha मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीचे उमेदवार अजून जाहीर झालेले नाहीत. मात्र भाजपकडून राज्यसभा सदस्य उदयनराजे Udayanraje Bhosale भोसले यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील Shriniwas Patil यांनी प्रकृतीच्या कारणास्तव यावेळी लढणार नसल्याचे जाहीर केल्यामुळे उदयनराजेंविरोधात कोण? असा प्रश्न राष्ट्रवादीत निर्माण झाला आहे. मात्र त्याचे उत्तर पक्षात न सापडल्याने शरद पवार Sharad Pawar यांनी ही जागा काँग्रेसला सोडण्याची तयारी दर्शवली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्यास ते उदयनराजेंना तगडी लढत देऊ शकतील, असे आडाखे शरद पवारांनी आखले आहेत.
शरद पवारांच्या या प्रस्तावाला काँग्रेसकडूनही अनुकूल प्रतिसाद मिळण्याचे संकेत मिळत आहेत. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil Meets Prithviraj chavan यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन सुमारे एक तास चर्चा केली. शरद पवार यांचा निरोप जयंत पाटील यांनी चव्हाणांपर्यंत पोहोचवल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. पक्षश्रेष्ठींशी बोलून आपण पुढील निर्णय घेऊ, असे चव्हाणांनी पवारांना कळवल्याचे सांगितले जाते.
Satara Loksabha- Udyan Raje v/s Pruthviraj chavan battle posiible
सातारा पवारांसाठी का महत्त्वाचे Why Satara Important For Pawar
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने साताऱ्यात उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांना उमेदवारी दिली होती. राजेंचा प्रभाव व काँग्रेस- राष्ट्रवादीचे नेटवर्क या जोरावर उदयनराजेंनी सुमारे १ लाख ३० हजारांच्या मताधिक्यांनी शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांचा पराभव केला होता. मात्र सहा महिन्याच्या आतच उदयनराजेंचे मतपरिवर्तन झाले व त्यांनी भाजपचा मार्ग धरला. विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे ऑक्टोबर २०१९ मध्ये राजेंनी राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. लगेच विधानसभेपाठोपाठ सातारा लोकसभेची पोटनिवडणूकही लागली, त्यात पुन्हा राजे भाजपच्या तिकिटावर उभे राहिले.
मोदी लाटेसारखी प्रतिकूल परिस्थिती असतानाही राष्ट्रवादीने उदयनराजेंना निवडून आणले. तरीही सत्तेच्या मोहापायी त्यांनी पक्ष सोडल्याचा शरद पवारांना राग आला. त्यांनी सातारा पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करुन उदयनराजे यांना धडा शिकवण्याचा निर्धार केला. आपले जवळचे मित्र, निवृत्त सनदी अधिकारी व माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील Former Governer Shriniwas Patil यांना राजेंविरोधात उमेदवारी देऊन स्वत: पवारांनी त्यांच्या प्रचारात लक्ष घातले. त्यावेळी भर पावसात साताऱ्यात पवारांची झालेली सभा खूप गाजली. परिणाम असा झाला की उदयनराजे यांचा पराभव झाला व श्रीनिवास पाटील ८७ हजार मताधिक्यांनी विजयी झाले. या पराभवाने केवळ उदयनराजेच नव्हे तर भाजपला मोठा धक्का बसला. मात्र पक्षाने तातडीने राजेंचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना राज्यसभेवर घेतले.
पवारांकडे आता तगडा उमेदवार नाही Pawar does not have a strong candidate
आता भाजपसाठी एक-एक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे पुन्हा पक्षाने राजेंनाच लोकसभेच्या मैदानात उतरवायचे ठरवले आहे. पण राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील प्रकृतीच्या कारणामुळे यंदा ही निवडणूक लढवणार नाहीत. त्यामुळे उदयनराजेंविरोधात कोण? असा प्रश्न पवारांसमोर आहे. माजी मंत्री शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या नावाची चर्चा होती. पण यापैकी कुणीही राजेंसमोर टिकणार नाही याची पवारांनी खात्री आहे. त्यामुळे त्यांनी थेट स्वच्छ प्रतिमा असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाच मैदानात उतरवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
पवारांचे व चव्हाणांचे फारसे सख्य नाही Pawar and Chavan are not very friendly
पृथ्वीराज चव्हाण Pruthviraj Chavan हे सातारा जिल्ह्यातील कराडचे रहिवाशी. त्यांचे घराणे पूर्वीपासूनच काँग्रेसशी एकनिष्ठ. १९९१, १९९६ व १९९८ मध्ये ते तत्कालिन कराड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पण १९९९ मध्ये काँग्रेसमध्य फूट पडून शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. पवारांच्याच पक्षाचे नेते श्रीनिवास पाटील यांच्याकडून १९९९ मध्ये चव्हाण यांचा पराभव झाला होता. मात्र हायकमांडशी एकनिष्ठ असल्याने काँग्रेसने नंतर चव्हाणांना राज्यसभेवर घेतले. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात ते केंद्रीय मंत्री होते. पीएमओची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. मात्र २०१० मध्ये महाराष्ट्र आदर्श घोटाळा उघडकीस आला व अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्रिपद गेले. त्यामुळे हायकमांडने पृथ्वीराज यांना दिल्लीतून पाठवले व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले.
पारदर्शी कारभार हे पृथ्वीराज Pruthviraj Chavan यांचे वैशिष्ट्य. म्हणूनच आघाडीत असूनही राष्ट्रवादीशी त्यांचे कधी पटले नाही. अजित पवार यांचा ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा Ajit pawar’s Irrigation Scam पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेच उघडकीस आला.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या फाईलींवर ते डोळे झाकून कधीच सह्या करत नव्हते. त्यामुळे अनेक प्रकरणे त्यांच्याकडे प्रलंबित होती. याच रागातून एकदा शरद पवार यांनी जाहीर कार्यक्रमात ‘त्यांच्या हाताला काय लकवा झालाय का?’ अशी टीका केली होती. मुळात, राष्ट्रवादीवर अंकुश ठेवण्यासाठीच सोनिया गांधींनी पृथ्वीराजबाबांना महाराष्ट्रात पाठवले होते, हा पवारांचा राग त्यामागे होता.
२०१४ पासून मात्र विरोधी बाकावर बसल्यावर शरद पवार व पृथ्वीराज चव्हाण यांच्यात हळूहळू स्नेह वाढत गेला. त्यांच्यातील कटूता कमी होत गेली. आता काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे राज्याचे प्रचारप्रमुखपद दिले आहे. मात्र साताऱ्यात तेच उदयनराजेंना तुल्यबळ लढत देऊ शकतात, असा पवारांचा विचार आहे. म्हणूनच चव्हाण लढत असतील तर साताऱ्याची जागा शरद पवार गट काँग्रेसला द्यायलाही तयार झाला आहे. आता अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांडला घ्यायचा आहे. Satara Loksabha- Udyan Raje v/s Pruthviraj chavan battle posiible.