अजितदादा गटाच्या गुंडगिरीला आळा घाला; इंदापूरमध्ये पुन्हा अजित पवार गट – हर्षवर्धन पाटील  वाद उफाळला

पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते व सध्या भाजपात गेलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाद पुन्हा उफाळला.

इंदापूर : पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते व सध्या भाजपात गेलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात विळ्या- भोपळ्याचे सख्य आहे. काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी तुटल्यानंतर अजित पवारांनी इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे हा समर्थक उमेदवार उभा करुन २०१४ मध्ये हर्षवर्धन पाटील यांचा पराभव घडवून आणला होता. या त्रासाला कंटाळून हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. २०१९ च्या निवडणुकीतही दादा समर्थक राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी सलग दुसऱ्यांदा हर्षवर्धन पाटील यांना धूळ चारली. आता २०२४ मध्ये तरी आपल्याला भाजपच्या जोरावर आमदारकी मिळेल या तयारीत हर्षवर्धन होते. मात्र आताही अजित पवारांनी भाजपशी युती केल्यामुळे हा विधानसभा मतदारसंघ पाटील यांना मिळण्याची शक्यता कमीच आहे. दोन्ही नेते आता महायुतीत असतानाही दादा गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून हर्षवर्धन पाटील यांना खुलेआम धमक्या देण्याचे सत्र सुरु झाले आहे. या प्रकाराला वैतागून हर्षवर्धन यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दादा गटाची पत्राद्वारे तक्रार केली आहे.

काय आहे हर्षवर्धन पाटील यांंच्या पत्रात

What is in Harshvardhan Patil’s letter?

पत्रात हषवर्धन पाटील यांनी लिहिले आहे की, महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने कामकाज करीत आहे. परंतु इंदापूरमधील मित्रपक्षांचे काही पदाधिकारी राजकीय मेळावे व सभांमधून माझ्यावर अतिशय खालच्या पातळीवर, एकेरी व शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करीत आहेत. त्याचबरोबर इंदापूर तालुक्यात मला फिरु न देण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत आहे. सदरील बाब अतिशय गंभीर असून, आपण यामध्ये तत्काळ लक्ष घालावे. अशा गुंड प्रवृत्तींच्या लोकांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. तरी आपण या बाबत ठोस भूमिका घेऊन कारवाईचे आदेश देऊन सहकार्य करावे, ही विनंती.’

हर्षवर्धन यांची मुलगी म्हणते, . तर ठाकरे शैलीत उत्तर देऊ
Harsh Vardhan’s daughter says, So let’s answer in Thackeray style.

अजित पवार गटाचे इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी अलिकडेच एका कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली होती. तसेच पाटील यांना तालुक्यात फिरु देणार नाही, अशी उघड धमकीही दिली होती. त्यावरुन हे राजकारण तापले आहे. हर्षवर्धन यांची कन्या अंकिता यांनी विरोधकांना चोख प्रत्त्युत्तर दिले होते. ‘प्रत्येकाने संस्कृती जपून पातळी सांभाळून बोलावे. माझ्या वडिलांबाबत जर कुणी एकेरी भाषेत बोलला तर त्यांना ठाकरे शैलीत उत्तर देऊ शकते,’ असा इशारा त्यांनी दिला होता. इतकेच नव्हे तर आम्हाला जे विधानसभेत मदत करतील, त्यांनाच लोकसभेत मदत करु, असा इशाराही त्यांनी अजित पवार गटाला दिला होता. हा वाद वाढत असतानाच हर्षवर्धन यांनी थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे महायुतीतील वादात आता मुख्यमंत्री काय मध्यस्थी करतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.