मोदींच्या मुंबईतील रोड शोमध्ये अजितदादांची गैरहजेरी, आजारपणाचे कारण पण रुसल्याची चर्चा

Absence of Ajit Dada in Modi's road show in Mumbai बारामतीसह लोकसभेच्या चारही जागा अडचणीत असल्याने अजितदादा नाराज असल्याची चर्चा

Absence of Ajit Dada in Modi’s road show in Mumbai

मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे चार टप्पा पार पडले. पहिल्या दोन टप्प्यात मतदान घटले, तिसऱ्या टप्प्यात बरोबरीत आले तर चौथ्या टप्प्यात मात्र कमालीचे वाढले. या घटत्या, वाढत्या मतटक्क्याचे अर्थ काढण्यात सर्वच राजकीय पक्ष व राजकीय पंडित व्यग्र आहेत. त्यातच आता २० मे रोज पाचव्या व महाराष्ट्राच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान होत आहे. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मुंबई- ठाण्यातील १० लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराकडे आपला मोर्चा वळवला आहे.

या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra modi यांनीच भाजपच्या प्रचाराचा मोर्चा सांभाळला आहे. २०१९ मध्ये ज्या मोदींनी महाराष्ट्रात ९ सभा घेतल्या, त्याच मोदींना आता तब्बल दुप्पट म्हणजे १८ सभा घेऊन आपली गॅरंटी जनतेला सांगण्याची वेळ आली आहे. १५ मे रोजी ईशान्य मुंबईतील घाटकोपर भागातून मोदींनी महाराष्ट्रातील पहिला रोड शो केला. Modi’s First Road Show in Mumbai भाजपचे मिहिर कोटेचा ईशान्य मुंबईत भाजपचे उमेदवार आहेत. या भागात मराठी व गुजराती मतदारांचे प्राबल्य आहे. येथील दोन्ही भाषिक उच्चशिक्षित मतदारांना आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी ४५ मिनिटात सुमारे अडीच किलोमीटर रोड शो करुन सर्वांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांच्या विशेष रथात स्वार झालेले दिसले. मोदींचा रोड शो भव्य दिव्य होता. कार्यकर्त्यांची फौजही मागे-पुढे होती. पण खटकण्यासारखी एक गोष्ट दिसली ती म्हणजे महायुतीच्या तीन घटक पक्षापैकी एक प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार Ncp leader Ajit Pawar मात्र मोदींच्या रथावर दिसले नाहीत. याबाबत मात्र आता संपूर्ण महाराष्ट्रात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.

Absence of Ajit Dada in Modi’s road show in Mumbai

राष्ट्रवादी पक्षाकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी अजितदादांची तब्येत ठीक नसल्याचे कारण दिले. मात्र त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते व मोदींचे निकटवर्तीय प्रफुल पटेल Praful Patel यांनाही मोदींच्या रथावर स्थान देण्यात आले नाही. याचे कारण काय असावे? अजितदादांचे आजारपण खरंच आहे की राजकीय? अशीही चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनीही ‘अजित पवार आजारी आहेत’ Ajit Pawar illness एवढेच उत्तर दिले. मात्र अजितदादांच्या अनुपस्थितीमागे काही तरी राजकारण असावे, असा वास येऊ लागला आहे.

अजितदादा नाराज आहेत का? Is Ajit Dada angry?

महायुतीच्या जागावाटपात भाजप, शिंदेसेनेपेक्षा अजितदादांना सर्वात कमी जागा मिळाल्या. भाजपला २८, शिंदेसेनेला १५ तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला फक्त ५ जागा मिळाल्या. त्यातही परभणीची एक जागा त्यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना द्यावी लागली. याचाच अर्थ महायुतीत अजितदादांचे स्थान बरोबरीचे नसून तिसऱ्या क्रमांकाचे आहे हे या जागावाटपातून स्पष्ट झाले. आपल्या पक्षाला ४ जागा मिळाल्या असल्या तरी अजितदादांचे संपूर्ण लक्ष फक्त बारामतीवर होते. दुसऱ्या टप्प्यात बारामतीची निवडणूक होईपर्यंत दादांनी आपल्या इतर ३ उमेदवारांकडे फारसे लक्षही दिले नाही. बारामतीची निवडणूक झाल्यानंतर त्यांनी मावळ, शिरुर व धाराशिवमध्ये प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. मात्र आता चौथ्या टप्प्याची निवडणूक झाल्यापासून मात्र दादा गायब झाले आहेत. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक, कल्याणमधील सभेत व मुंबईतील रोड शोमध्येही ते दिसले नाहीत. म्हणूनच त्यांच्या गैरहजेरीची व आजारपणाची चर्चा सुरू झाली आहे.

Absence of Ajit Dada in Modi’s road show in Mumbai

चारही जागा गमावण्याची अजितदादांना भीती

राजकीय विश्लेषकांच्या मते, अजितदादांना शिरुर, मावळ व धाराशिवमध्ये मतदारांकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे या तीन पैकी एकही जागा निवडून येण्याची शक्यता कमीच आहे. आता त्यांच्या सर्व आशा आहेत त्या बारामती या एकमेव जागेवर. मात्र तिथेही अटीतटीची लढत झाल्यामुळे या मतदारसंघात सुप्रिया सुळे विजयी होतील का सुनेत्रा पवार? हे छातीठोकपणे सांगण्याचे धाडस कुणीही करु शकत नाही. मतदानाची बूथनिहाय आकडेवारी समोर आल्यानंतर कदाचित पवार काका- पुतण्यांना निकालाचा अंदाज आला असेलच. कारण वर्षानुवर्षे दोघेही निवडणुकीची व्यवस्थापन करण्यात व त्यानंतरचे अंदाज बांधण्यात मास्टर आहेत. बारामतीसह चारही मतदारसंघात अपयशाची भीती वाटत असल्यामुळेच निराश झालेले अजितदादा पाचव्या टप्प्यातील प्रचारापासून दूर झाले आहेत का ? की ते मित्रपक्षांवर रुसले आहेत का? असाही एक मतप्रवाह राजकीय वर्तुळात आहे.

दुसरे महत्त्वाचे करण म्हणजे, पाचव्या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या १३ मतदारसंघांपैकी एकाही जागेवर अजितदादा गटाचे उमेदवार नाहीत. इथे महायुतीकडून फक्त भाजप व शिंदेसेनेचे उमेदवार आहेत. परिणामी आपला उमेदवारच नसल्याने अजितदादांनी आजारपणाचे कारण देत प्रचारापासून दूर राहणे पसंत केल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

प्रफुल पटेलही वादाच्या भोवऱ्यात
Praful Patel is also in controversy

अजित पवार जर आजारी असतील तर त्यांच्याजागी राष्ट्रवादीत महत्त्वाचे नेते असलेले माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांना मोदींच्या रोड शोमध्ये स्थान देऊन युतीचा धर्म भाजपने निभावला का नाही? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवरायांप्रमाणे जिरेटोप घालून आधीच प्रफुल पटेल टीकेचे धनी झालेले आहेत. विरोधकांनी त्यांच्या या कृतीवर टीका केल्यानंतर प्रफुल पटेल सोशल मीडियावरही जास्तच ट्रोल झालेत. त्यामुळे त्यांना पुन्हा मोदींच्या बाजूला स्थान देऊन त्या वादाला पुन्हा हवा देण्याचा धोका भाजपला पत्कारायचा नव्हता. त्यामुळे अजितदादांच्या अनुपस्थितीत पटेल यांचाही रोड शोमध्ये सहभाग दिसला नाही.

विधानसभेला बसणार फटका

एकूणच, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे जहाज महाराष्ट्रात डळमळीत झाल्याचे चित्र दिसत आहे. पंतप्रधान मोदींनी २०१९ पेक्षा दुप्पट सभा घेऊनही राज्यात महायुतीला यश मिळणार नसेल तर केवळ महायुतीतील तीन पक्षांच्याच नव्हे तर मोदींच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकते. तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. दोन- दोन पक्ष फुटल्यानंतरही जर महाविकास आघाडीला १५ ते २० जागा मिळाल्या तर विकासाच्या गॅरंटीपेक्षा सहानुभूतीची लाट जिंकली असेच म्हणावे लागेल. यातून महायुतीतील तिन्ही घटक पक्षात अपयशाचे खापर एकमेकावर फोडण्याची स्पर्धाही लागू शकते. आधीच अजितदादांना युतीत घेतल्याने नाराज असलेला भाजपमधील केडर विधानसभेला स्वबळाची भाषा बोलू शकतो. या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या निकालापूर्वीच अजित पवार भाजपशी अंतर ठेवून राहात आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics