लोकसभा निवडणु्कीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा मोदींसोबत येण्याची चर्चा

Uddhav Thackeray getting back together with Modi शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray getting back together with Modi after the results of the Lok Sabha

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यातील मतदानानंतर १ जून रोजी प्रमुख वृत्तवाहिन्या व सर्व्हेक्षण संस्थांनी एक्झिट पोल जाहीर केले. त्यानुसार, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएची देशात सलग तिसऱ्यांदा सत्ता येत असल्याचे संकेत मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे ४०० पारचे स्वप्न मात्र पूर्ण होताना दिसत नाही. भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचे ३५० ते ३७५ पर्यंत खासदार निवडून येऊ शकतात, असे हे एक्झिट पोल सांगतात. महाराष्ट्रात मात्र महायुतीच्या जागा घटणार असून महाविकास आघाडीला ‘अच्छे दिन’ येणार असल्याचे या आकडेवारीवरुन दिसून येते. महाराष्ट्रात भाजप व महायुतीला ३० च्या आत जागा मिळत असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले. अशा वेळी भाजपचा ४०० पार जागांचा ‘अश्वमेघ’ रोखण्यात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण भूमिका ठरू शकते. तसे झाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi व अमित शाह Amit Shah महाराष्ट्र भाजपावर प्रचंड नाराज होतील.

एकनाथ शिंदे Cm Eknath Shinde व अजित पवार Dcm Ajit Pawar यांना हाताशी धरुन त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादी फोडण्याचे जे काम केले, मात्र महाराष्ट्रातील जनतेला त्यांची ही कृती पटली नाही असा निष्कर्ष या निकालातून काढला जाईल.

सहा महिन्यांनी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही शरद पवार Sharad Pawar व उद्धव ठाकरेंबद्दलची Udhav Thackeray जनतेत असलेल्या सहानुभूतीचा ट्रेंड कायम राहिला तर तो महायुतीला घातक ठरु शकतो. त्यामुळे विधानसभेला जर भाजपला महाराष्ट्रात सत्ता कायम टिकवायची असेल तर एकनाथ शिंदे व अजित पवार हे फारसे उपयोगी पडणार नाहीत. त्याएेवजी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या ‘असली शिवसेने’लाच जवळ करण्याच्या पर्यायाची भाजपकडून चाचपणी सुरू असल्याचे बाेलले जाते. उद्धव ठाकरेंकडूनही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला जाऊ शकतो. बिहारमध्ये ज्या प्रमाणे नितीशकुमार यांनी राजदची साथ सोडून पुन्हा एनडीएत प्रवेश केला त्याच धर्तीवर उद्धव ठाकरेही महाविकास आघाडीतून पुन्हा महायुतीत सामील होऊ शकतात, अशी चर्चा सुरु झाली आहे. एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर महायुतीतील नेत्यांनी यासंदर्भात वक्तव्ये केल्याने या चर्चेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Uddhav Thackeray getting back together with Modi after the results of the Lok Sabha

ठाकरेंना पुन्हा एनडीएत यायचंय : दीपक केसरकर Thackeray wants to come back to NDA: Deepak Kesarkar

शिंदेसेेनेचे प्रवक्ते व राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना हा गौप्यस्फोट करुन भविष्यातील राजकीय घडामोडीचे संकेत दिले आहेत.  ते म्हणाले की,  ‘गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कारण ठाकरेंना पुन्हा एनडीएत यायचे आहे. त्यासाठी ते विविध लोकांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना मेसेज पाठवत आहेत.’

१५ दिवसात मोदी- ठाकरे एकत्र : रवी राणा Modi – Thackeray together in 15 days: Ravi Rana

अमरावती जिल्ह्यातील अपक्ष आमदार व भाजपचे सहयोगी सदस्य रवी राणा यांनीही अशाच प्रकारचा दावा केला आहे. राणा म्हणाले, ‘नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर १५ दिवसांतच उद्धव ठाकरे हे मोदी यांच्याबरोबर ते दिसतील. कारण येणारा काळ हा मोदी यांचा आहे.’

मोदी, शाह, शिंदेच ठरवतील : संजय शिरसाट

रवी राणा यांच्या दाव्यावर शिंदेसेनेचे दुसरे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे महायुतीत येणार की नाही या जर-तरच्या गोष्टी आहेत. त्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घेतील. उद्धव ठाकरे यांनी यावे किंवा न यावे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यांना महायुतीत घ्यायचे की नाही हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ठरवतील.’

विशेष म्हणजे या दाव्यानंतर उद्धव ठाकरेंकडून त्याचे खंडनही करण्यात आलेले नाही.

Uddhav Thackeray getting back together with Modi after the results of the Lok Sabha

मोदींनी दिली होती जाहीर ऑफर Modi had given a public offer

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या पक्षाची ‘नकली’ म्हणून हेटाळणी केली. तसेच शरद पवार यांच्या प्रादेशिक पक्षाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या वक्तव्याचा संदर्भ देत या दोघांनीही अनुक्रमे एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या ‘असली’ शिवसेना- राष्ट्रवादीत विलिन व्हावे, अशी जाहीर ऑफर दिली होती. त्यावरुन ठाकरे व पवार यांना एनडीएत घेण्यास मोदी उत्सुकत असल्याचे संकेत महाराष्ट्राला मिळाले. मात्र मोदींच्या या वक्तव्याने महाराष्ट्र भाजपात, विशेषत: शिंदे- अजित पवारांत अस्वस्थता पसरली. त्यामुळे एका सभेतून दिलेल्या या ऑफरचा पुनरुच्चार करण्याची चूक मोदींनी महाराष्ट्रात केली नाही. पण ते ठाकरेंना पुन्हा आपल्या सोबत घेण्यास इच्छूक असल्याचे लपून राहिले नाही. एका मुलाखतीत बोलतानाही मोदींनी ‘उद्धव ठाकरे माझे वैयक्तिक शत्रू नाहीत, त्यांच्यावर जेव्हा संकट येईल तेव्हा मदतीला धाऊन जाणार मी पहिला असेल’ असे वक्तव्य करुन त्यांच्याविषयी जवळीकता दाखवली होती.

उद्धव ठाकरेंनाही चूक सुधारण्याची संधी chance for Uddhav Thackeray to correct his mistake

भाजपने शब्द फिरवल्याचा सूड घेण्यासाठी व आपला मुख्यमंत्रिपदाचा हट्ट  पूर्ण करुन घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी २०१९ मध्ये भाजपची साथ सोडून काँग्रेस- राष्ट्रवादीशी मैत्री केली. मात्र त्याचे गंभीर परिणाम ठाकरेंना भोगावे लागले. अडीच वर्षेच सत्ता मिळाली खरी पण त्यात बदनामीच जास्त झाली. पुन्हा सत्तेतून पायउतार झाल्यानंतर पक्षही फुटला. कालपर्यंत जे नेते, कार्यकर्ते अापला शब्द ‘आदेश’ मानत हाेते ते आज खालच्या पातळीवर टीका करण्याचे धाडस करू लागले. वडिलांनी कष्टाने उभारलेला शिवसेना पक्ष व चिन्ह गमावण्याची वेळ आली. हिंदुत्ववादी पक्ष अशी बाळासाहेब ठाकरेंनी Balasaheb Thackeray’s Hindutav निर्माण केलेल्या प्रतिमेलाही तडे गेले.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर काही प्रमाणात यश मिळाले तरी ते चिरकाल टिकणारे नसेल. भविष्यातही काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत राहिले तर आहे ते हिंदुत्ववादी मतदार आपल्यापासून दुरावतील या वास्तवाची उद्धव ठाकरेंनाही जाणीव आहे. त्यामुळे त्यांनाही पुन्हा भाजपसोबत येण्याची इच्छा असू शकते. मात्र पुन्हा युती करणे ही आपलीच गरज आहे असे ते कदाप दाखवणार नाहीत. किंवा मोदींसमोर बिनशर्त शरणगतीही पत्कारणार नाहीत. मात्र भाजपकडून ऑफर आली तर मात्र ती संधी उद्धव ठाकरे सोडणार नाहीत, असे राजकीय विश्लेषकांना वाटते.

पुन्हा युती झाल्यास अडीच- अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद If there is an alliance again, the chief ministership will be two and a half years

लोकसभेचे निकाल काय लागतात त्यावर या पुढच्या घडामोडी अवलंबून आहेत. महाराष्ट्रात महायुतीला २५ ते ३० च्या आत रोखण्यात यश आले व महाविकास आघाडीत उद्धव सेना मोठा पक्ष ठरला तरच मोदींना खऱ्या ठाकरे ब्रॅन्डचे महत्त्व पटेल व ते उद्धव यांना महत्त्व देऊ शकतात. त्यानंतर  ऑक्टोबरमध्ये  होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप- शिवसेना एकत्र येण्याची घडामोड घडू शकते. किंवा विधानसभा निवडणुकीत युती व आघाडी परस्परविरोधी लढली व त्यात शिंदेसेना व अजित पवार गटाचा भाजपला फारसा फायदा झाली नाही तर भाजप विधानसभेच्या निकालानंतरही या शिंदे- अजितदादा या दोन्ही गटाशी फारकत घेऊन उद्धव ठाकरेंशी हातमिळवणी करुन महाराष्ट्रात सत्ता राखू शकते. त्यासाठी प्रसंगी अडीच- अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युलाही भाजपकडून मान्य केला जाऊ शकतो. मात्र पहिले अडीच वर्षे त्यांना उद्धव ठाकरेंना द्यावी लागतील.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics