मनोज जरांगेंची मोठी घोषणा! 20 जानेवारीला आझाद मैदानावर आमरण उपोषण; पुढील रणनीती ठरली; बीडच्या सभेतून मराठा मोर्चाचा यल्गार
Manoj Jarange Live from Beed : मराठा आरक्षणावरून राज्यभर मनोज जरांगेंचे यांचे दौरे सुरू आहेत. सध्या मराठवाड्यात मनोज जरांगें यांचे दौरे आहेत. बीडमधील सभेतून मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलनकर्त्यांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले. यामध्ये कोणीही हिंसाचार न करता हे आंदोलन करण्याचे आवाहन त्यांनी केले. हे ब्रह्मास्त्र सरकारला सुद्धा पेलता येणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचेच नाही, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.
बीडमधून मराठा आरक्षणावरून सभा
निष्पाप पोरांना गुतवण्याचे षडयंत्र सरकारने केले. मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती. मराठ्यांना राज्यात शांतता हवी होती. मनोज जरांगेंची बीडमधून मराठा आरक्षणावरून सभा. ते ‘येवल्याचे येडपट’ आमच्या वाटेला जाऊ नको म्हणालो होतो. मला गिरीश महाजनांनी सांगितले होते, तुम्ही त्यांच्यावर बोलू नका. मी त्यांना सांगितले होते. माझ्या मराठ्यांच्या आरक्षणाविरुद्ध कोणी जात असेल तर त्याला सोडणार नाही. आरक्षण मिळू दे, तुला दाखवतो कचका कसा असतो. हे कळून घेना हे मराठे कशासाठी येथे आले आहेत. भुजबळ मला आता साहेब म्हणू लागले आहेत.
तुमचा राजकीय अस्तित्वाचा सुपडा साफ होईल
तुमचा राजकीय अस्तित्वाचा सुपडा साफ होईल. नवनवीन प्रयोग राबवू नका. तुम्ही एकदा प्रयोग केला आहे. आता सावध व्हा. मराठा समाज आता एकत्र आलाय. ठरल्याप्रमाणे आरक्षण द्या. त्याचे ऐकून तुम्ही आरक्षणाला विरोध करू नका. आता जिल्ह्याला जिल्हे आणि घराला घर बाहेर पडणार आहे. आधी समाज आणि नंतर मग घर. हा मराठा समाजाच माझा मायबाप आहे. मी या समाजाशी गद्दारी करायला आंदोलन केला नाही. ही तर आर्ध्या बीड जिल्ह्याची ताकद आहे. मायबाप तुमची एकजुटीची ताकद जिवंत असेल तोपर्यंत वाया जाऊ देणार नाही. माझ्यासाठी आधी समाज, नंतर माझं कुटुंब.
सरकार मराठा समाजाची फसवणूक करतेय. सरकार मराठ्यांचा अपमान करतेय. मराठ्यांच्या जीवावर सत्तेच्या गाद्या मिळवायच्या आणि त्याचा लाभ या छगन भुजबळसारख्यांना द्यायचा. मायबाप हो सावध व्हा, सरकार गांभीर्याने घेत नाही. यांना आता वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही. बीड जिल्ह्याने दाखवून दिले. जो आपल्या लेकरांच्या हिताचा निर्णय घेईल, तोच आपला आहे. देशाचे संरक्षण करणारा हा मराठा समाज आहे. आमचे पडणारे मुडदे पाहताना हसत बसता. राज्याचे पालकमंत्री तुम्ही स्वीकारले आहे. मराठा समाजाला आता डवचू नका, यांना वाटलं, मागे केस.