फडणवीसांवर जिवे मारण्याच्या कटाचा आरोप करुन मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे पाटील आंतरवलीत परत फिरले

Dispute On Maratha Reservation- battle of Manoj Jarange patil and Devendra Fadanvis

जालना : मराठा आरक्षणासंदर्भात सगे-सोयरे निर्णयाची अंमलबजावणी करण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे आडकाठ आणत आहेत. आमचे आंदोलन उधळून लावण्याचा त्यांचा डाव आहे. इतके नव्हे तर सलाईनमधून विष देऊन मला जिवे मारण्याचा कटही त्यांनी आखला होता, असा खळबळजनक आरोप मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी २५ फेब्रुवारी रोजी केला. इतकेच नव्हे तर तर आपल्या मागणीची पूर्तता करुन घेण्यासाठी ते तावातावाने मुंबईकडेही निघाले होते. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी २६ फेब्रुवारी रोजी प्रशासनाने अंबड तालुक्यात संचारबंदी (Curfew in Ambad) व  शेजारच्या बीड व संभाजीनगर जिल्ह्यात इंटरनेट बंदी  (Internet ban in Beed and Sambhajinagar) लावल्याने जरांगे व त्यांच्या समर्थकांना भांबेरी गावातून परत आंतरवली सराटी येथे यावे लागले. आता आपल्या आंदोलनाची पुढील दिशा सायंकाळी ५ वाजता जाहीर करणार असल्याचे जरांगे यांनी जाहीर केले आहे.

भाजप नेते जरांगेंवर तुटून पडले Dispute On Maratha Reservation-  

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी फडणवीस Devendra Fadanvis यांच्यावर बेछूट आरोप केल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी मात्र जरांगे यांच्यावर चोहोबाजूनी टीकेची झोड उठवली आमदार नितेश राणे, अतुल भातखळकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी जरांगे यांना खालच्या पातळीवरची भाषा सहन केली जाणार नसल्याचे सुनावले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही कुणी कायदा हाती घेतला तर त्यांना सोडणार नसल्याचा इशारा दिला. स्वत: फडणवीस यांनीही ‘सागर बंगल्यावर येणाऱ्यांचे स्वागत करु. मात्र कायदा व सुव्यवस्था हाती घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल,’ असा इशारा त्यांनी दिला.

जरांगेंच्या तोंडी ठाकरे- पवारांची भाषा : फडणवीस

जरांगेंच्या आरोपांना अतिशय सावध उत्तर देताना फडणवीस Devendra Fadanvis यांनी फार काही बोलणे टाळले. मात्र ‘आतापर्यंत जी भाषा उद्धव ठाकरे- शरद पवार वापरत होते ती जरांगेंच्या तोंडी आली आहे,’ असे सांगून या आंदोलनामागे विरोधकांची फूस असल्याचा अप्रत्यक्ष आरोप त्यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics