महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया आता संपली. आता खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी, राजकीय डावपेच सुरु होती. प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळे डावपेच टाकले जातात. त्यातला एक कॉमन डावपेच असतो तो म्हणजे प्रतिसपर्धी उमेदवाराशी नामसाधर्म्य असलेल्या अन्य उमेदवारांना उभे करायचे व त्या माध्यमातून विरोधकांची मतांच्या विभाजन करायचे. हा प्रकार या निवडणुकीतही होतोय.. कोणकोणत्या मतदारसंघात हे डावपेच खेळले जात आहेत अन खरंच त्याचा परिणाम होतो का? याबाबत जाणून घेऊ मिशन पॉलिटिक्समधून
सांगली जिल्ह्यातील तासगाव- कवठे महांकाळ मतदारसंघात मुख्य लढत राष्ट्रवादीत्या दोन गटात होत आहे. या मतदारसंघातून दिवंगत आर. आर. पाटील यांचे पूत्र रोहित हे युवा नेते शरद पवार गटाकडून मैदानात आहेत. तर भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांना आपल्या पक्षात घेऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात आरआर आबांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या पश्चातही पत्नी सुमनताई यांना मतदारांनी दोनदा निवडून आले. आताही रोहित यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र त्यांच्या विरोधकांनी या मतदारसंघात रोहित पाटील नावाने अन्य ३ अपक्ष उमेदवार उभे केले आहेत. रोहित रावसाहेब पाटील, रोहित राजगोंडा पाटील, रोहित राजेंद्र पाटील हे रिंगणात आहेत. याशिवाय संजय पाटील नावाच्या अपक्षानेही अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या जागेवर ४ रोहित पाटील आणि २ संजय पाटील यांच्यात अनोखी लढत पहायला मिळत आहे…
पुणे जिल्ह्यातील पर्वती विधानसभा जागेवर भारतीय जनता पक्षाच्या माधुरी मिसाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पवार पक्षाच्या अश्विनी कदम यांच्यात मुख्य लढत आहे. मात्र, अश्विनी नावाच्या तीन उमेदवार रिंगणात असून त्यात अश्विनी कदम नावाच्या दोन महिलांनीही उमेदवारी दाखल केली आहे. अश्विनी खैरनार आणि अश्विनी कदम या अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत, तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या वतीने वतीने अश्विनी कदम आव्हान देत आहेत.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर जागेवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून चंद्रकांत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार रोहिणी एकनाथ खडसे यांच्याशी लढत आहे. याशिवाय दोन महिला उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. रोहिणी पंडित खडसे आणि रोहिणी गोकुळ खडसे अशी त्यांची नावे आहेत. या दोन महिला स्थानिकही नाहीत. एक वाशिम जिल्ह्यातील तर दुसरी महिला अकोल्याची आहे. चंद्रकांत पाटील नावाचे 2 अपक्ष उमेदवारही येथून नशीब आजमावत आहेत. शिवसेनेकडून चंद्रकांत निंबा पाटील यांच्याशिवाय अन्य दोन चंद्रकांत पाटील अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.
सांगलीच्या इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत राजाराम पाटील आणि अजित पवार गटाचे निशिकांत पाटील यांच्यात लढत आहेत. विशेष म्हणजे येथील दोन अपक्ष उमेदवारांचे नाव जयंत पाटीलच आहे. त्यापैकी एक जयंत राजाराम पाटील आणि दुसऱ्याचे नाव जयंत रामचंद्र पाटील असे आहे. तर निशिकांत पाटील या समान नावाचे दोन उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभेसाठी समान नावे असलेले अनेक उमेदवार रिंगणात आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून हर्षवर्धन पाटील तर अजित पवार गटाकडून दत्तात्रय भरणे आहेत. येथे हर्षवर्धन पाटील नावाच्या दोघांनी तर दत्तात्रय भरणे नावाच्या एका व्यक्तीने अपक्षही अर्ज दाखल केले आहेत. अशाप्रकारे इंदापूर जागेसाठी हर्षवर्धन पाटील यांच्या नावाने 3 आणि दत्तात्रेय भरणे यांच्या नावाने 2 जण रिंगणात आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा जागेवर एकूण 6 कदम (3 योगेश कदम आणि 3 संजय कदम) यांच्यात लढत आहे. शिवसेनेकडून योगेश कदम (शिंदे) आणि संजय कदम हे उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहेत. याशिवाय योगेश कदम आणि संजय कदम हे दोन अपक्ष उमेदवार म्हणून राजकीय पक्षांचे समीकरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभेच्या जागेवर नामवंतांमध्ये लढत होत आहे. शिवसेनेचे महेश शिंदे (शिंदे) आणि राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे (शरद पवार) यांच्यात चुरशीची लढत आहे. या जागेवर शशिकांत शिंदे या तीन वेगवेगळ्या उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल करून लढत रंजक बनवली आहे. शशिकांत शिंदे यांच्या नावाने अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. कोरेगाव मतदारसंघातून एकूण 4 महेश शिंदे आणि 2 शशिकांत शिंदे रिंगणात आहेत. महेश या नावाबाबत येथे बराच गोंधळ आहे. महेश माधव शिंदे (अपक्ष), महेश संभाजीराजे शिंदे (शिवसेना), महेश संभाजी शिंदे आणि महेश सखाराम शिंदे यांच्यासह महेश माधव कांबळे हेही आव्हान देणार आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड जागेवर जोरदार लढत आहे. भाजपने माजी मंत्री राम शिंदे यांना येथे उमेदवारी दिली आहे, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून रोहित पवार रिंगणात आहेत. रोहित हे प्रभावशाली शरद पवार कुटुंबातील आहेत. या ठिकाणी राम शिंदे आणि रोहित पवार नावाने 2 जण अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. अशा स्थितीत रोहित पवार या नावाने 3 आणि राम शिंदे नावाचे 3 उमेदवार मैदानात आपले नशीब आजमावत आहेत.
आता तुम्ही म्हणाल.. मतदार सुशिक्षित आहेत. उमेदवाराचे नाव सारखे असले तरी चिन्ह वेगवेगळे असते, त्यामुळे काही फरक पडत नाही. पण हा तुमचा गैरसमज आहे…
दिंडोरी लोकसभा निवडणुकीत असाच प्रकार घडला होता. या निवडणुकीत शरद पवार गटाने भास्कर भगरे गुरुजी यांना उमेदवारी दिली तर भाजपकडून डॉ. भारती पवार मैदानात हाेत्या. तिथे तिसरी पास असलेल्या बाबू भगरे या अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला होता. भास्कर भगरे हे गुरुजी किंवा सर नावाने लोकप्रिय आहेत. पण तिसरी पास बाबू भगरे यांनीही आपल्या नावासमोर अर्ज भरताना सर हे पदनाम लावले होते. उमेदवाराला तसा अधिकार असतो की काय नाव लावायचे ते. विशेष म्हणजे त्यांना निवडणूक चिन्ह ही भास्कर भगरे यांच्या तुतारी या चिन्हाशी साधर्म्य असणारा तुतारी हेच चिन्ह मिळाले. मग काय कथित सुशिक्षित मतदारांचाही गोंधळ झाला. तब्बल १ लाख ३ हजार मते या तिसरी पास भगरे गुरुजींनी घेतली. त्यामुळे शरद पवार गटाच्या भगरे गुरुजींना त्याचा फटका बसला. अर्थात राष्ट्रवादीचेच भगरे इथे निवडून आले पण नामसाधर्म्यामुळे त्यांचे मताधिक्य १ लाखांनी कमी झाले. हे तिसरी पास भगरे गुरुजींनी मिळवले. आता विधानसभेला असे नामसाधर्म्य असणारे उमेदवार कुणाकुणाची कोंडी करतात ते २३ नोव्हेंबरलाच कळेल.