तिसऱ्या मिलेनियम नॅशनल स्कूल व कुंटे चेस अकादमी पुरस्कृत विविध वयोगटातील स्पर्धा; ‘या’ खेळाडूंना मिळाले विजेतेपद
पुणे : कुंटे चेस अकादमी आणि मिलेनियम नॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने व किंडर स्पोर्ट्स एलएलपी यांच्या सहकार्याने आयोजित तिसऱ्या मिलेनियम नॅशनल स्कूल व कुंटे चेस अकादमी पुरस्कृत विविध वयोगटातील खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत प्रथमेश शेरला, संदेश बजाज, कविश लिमये, अर्जुन कौलगुड यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
सागर कोल्हेचा पराभव करून 7 गुणांसह अव्वल स्थान
मिलेनियम स्कूल, कर्वेनगर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत 10वर्षांखालील गटात कविश लिमये याने विहान देशमुखचा पराभव करून 6.5 गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला. 8 वर्षाखालील गटात अर्जुन कौलगुड याने शौर्य घेलानीचा पराभव करून 7 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. रेटेड गटात प्रथमेश शेरला याने सुयोग वाघचा पराभव करून 6 गुणांसह विजेतेपद पटकावले. अनरेटेड गटात संदेश बजाजने सागर कोल्हेचा पराभव करून 7 गुणांसह अव्वल स्थान मिळवले.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण कुंटे चेस अकादमीच्या संचलिका मृणालिनी कुंटे, चीफ आरबीटर दिप्ती शिदोरे, राजेंद्र शिदोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
निकाल : सातवी फेरी : रेटेड गट :
सुयोग वाघ(5गुण) पराभुत वि. प्रथमेश शेरला(6गुण);
आर्यन करमळकर(6गुण) वि.वि.अक्षय जोगळेकर(4.5गुण);
प्रणव बरली (4गुण) पराभुत वि. अभिजय वाळवेकर (5गुण);
सुनील वैद्य (4गुण)पराभुत वि. मार्मिक शहा(5गुण);
पृथ्वीराज पाटील(4.5गुण)बरोबरी वि. प्रतिती खंडेलवाल(4.5गुण);
अनरेटेड गट :
सागर कोल्हे(5गुण)पराभुत वि.संदेश बजाज(7गुण);
रामलिंग घोडके(6गुण) वि.वि.वेदमंत्रा भोसले(5गुण);
अर्पित गजभिजे(6गुण)वि.वि.गर्व देवनानी (5गुण);
अविनाश नेमा (5गुण)पराभुत वि.शिवम सिंग(6गुण);
रेयांश झड (5.5गुण) वि.वि.आयुष नारलेकर (4.5गुण);
8 वर्षाखालील गट :
शौर्य घेलानी(5गुण)पराभुत वि. अर्जुन कौलगुड (7गुण);
विराट दोडके(6गुण) वि.वि.कृष्णा येंगे(5गुण);
शिवम दातिर(4.5गुण)पराभुत वि. गोरांक्ष खंडेलवाल (6गुण);
सचिन शाळवे (5गुण) वि.वि.सुशांत डेलिया (4गुण);
शौर्य सोनावणे (5गुण) वि.वि.सनय गोखले(4गुण);
10वर्षाखालील गट :
विहान देशमुख(5.5गुण) पराभुत वि. कविश लिमये(6.5गुण);
ईशान अर्जुन पीवाय(6गुण)वि.वि.सम्यक कुलकर्णी (5गुण);
विहान देव(4गुण)पराभुत वि. धृव मळेकर (6गुण);
तेजस्वी(4गुण) पराभुत वि. श्री भोंग(5गुण);
विनय एसके(5गुण) वि.वि.आर्ग्य देशमुख(4गुण).