maharashtra-loksabha-controversy-over-seat-sharing-in-shiv-sena-bjp
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ४८ पैकी किमान ३२ ते ३५ जागा लढवण्यावर भाजप ठाम आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना (Shiv sena Eknath Shinde) व अजित पवारांची राष्ट्रवादी (NCP Ajit Pawar) यांची फक्त १२ ते १६ जागांवर बोळवण होणार आहे. यापूर्वी मुंबईच्या दौऱ्यावर आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शिंदे- पवारांना हे स्पष्टपणे सांगितले होते. मात्र ते राजी झाले नाहीत. ८ मार्च रोजी रात्री उशिरा शिंदे, पवार यांनी अमित शाह यांची दिल्लीत भेट घेऊन आपली मागणी त्यांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केला, मात्र शाह निर्णयावर ठाम राहिले. त्यामुळे शिंदे, पवारांना हात हलवत परत यावे लागले.
यंदा देशात भाजपचे ३७० व एनडीएचे ४०० खासदार निवडून आणण्याचा विडा नरेंद्र मोदी (Narendra Modi) व अमित शाह (Amit Shah) यांनी उचलला आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश, बिहार व महाराष्ट्र ही तीन सर्वाधिक जागा असलेली राज्ये महत्त्वपूर्ण आहेत. उत्तर प्रदेशात भाजप वरचढ आहे. बिहारमध्ये आता नितीशकुमार सोबत आल्याने तिथेही चिंता मिटली. पण महाराष्ट्राबाबत अजूनही मोदी- शाह चिंतेत आहेत. कारण दोन वर्षांपूर्वी शिवसेना फोडून सोबत आणलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा अजूनही राज्यात अपेक्षित प्रभाव पडत नसल्याचे भाजपच्या सर्व्हेतून समोर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ४५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अडचणी येत असल्याची भाजपला जाणीव आहे. त्यामुळे ८ महिन्यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडून अजित पवारांचा गटही (Ajit Pawar Ncp) सोबत घेतला. पण महाराष्ट्रातील जनतेने त्यांनाही फारसे स्वीकारलेले दिसत नाही. उलट शरद पवार (Sharad Pawar) व उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्याविषयी सहानुभूती वाढत आहे. त्यामुळे या मित्रपक्षांना फारशा जागा न देता आपणच ४८ पैकी ३२ ते ३४ जागा लढवण्याचा निर्णय भाजप श्रेष्ठींनी घेतला आहे. म्हणूनच शिंदे गटाला १० ते १२ व अजित पवार गटाला फक्त ४ जागा देण्याचे भाजपने ठरवले आहे. त्या बदल्यात विधानसभेत दोन्ही मित्रपक्षांना झुकते माप दिले जाईल, असा शब्द अमित शाह यांनी दिला आहे. पण विद्यमान खासदारांना तिकिट कसे नाकारू शकता? असा शिंदे गटाचा सवाल आहे.
maharashtra-loksabha-controversy-over-seat-sharing-in-shiv-sena-bjp
दिल्लीत रात्री २ तास चर्चा Meeting With Amit Shah
७ मार्च रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासह प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीच्या नेत्यांनी भाजप पक्षश्रेष्ठींशी दिल्लीत जाऊन चर्चा केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ८ मार्च रोजी अमित शाह यांनी मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व अजित पवार (Ajit Pawar) यांनाही दिल्लीत पाचारण केले. ‘जनमत तुम्हाला अनुकूल नाही, त्यामुळे जास्त जागांचा हट्ट करु नका. मोदी गॅरंटीमुळे भाजपला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जागा आम्हाला लढू द्या. हवे तर तुमचे काही उमेदवारही ‘कमळा’वर लढतील. भावनेच्या आहारी न जाता प्रॅक्टीकल निर्णय घ्या’ असे शाह यांनी पवार व शिंदे यांना सांगितले. मात्र बंडात आमच्यासोबत आलेल्या नेत्यांना संधी दिली नाही तर ते परतीचा मार्ग धरु शकतात, अशी भीती या दोघांनी व्यक्त केली. त्यावर लोकसभेची भरपाई विधानसभेत करू, असा शब्द अमित शाह यांनी त्यांना दिला. दोघांनीही शाह यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला पण ते निर्णयावर ठाम राहिले. त्यामुळे शिंदे, पवारांना हात हलवत मुंबईत परत यावे लागले.
https://missionpolitics.com/seat-sharing-of-mahayuti-was-decided/
शिरसाट म्हणाले.. शिंदेंनी उठाव केला म्हणून भाजपला सत्ता
भाजपच्या या दबावामुळे या दोन्ही मित्रपक्षांच्या नेत्यांमध्ये मात्र नाराजीचे वातावरण आहे. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. यापूर्वी शिंदेसेनेचे नेते रामदास कदम, गजानन किर्तीकर यांनी भाजपला खडसावले होते. आता पक्षाचे प्रवक्ते व शिंदे यांचे निकटवर्तीय आमदार संजय शिरसाट (Shiv Sena MLA Sanjay Shirsat) यांनीही थेट देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले आहे. रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या ‘भाजपने केसाने गळा कापू नये’ या आरोपाला उत्तर देताना फडणवीस यांनी ‘भाजपचे १०५ आमदार असूनही आम्ही कमी आमदार असलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्रिपद दिले’ ही आठवण करुन दिली होती. त्याला प्रत्त्युत्तर देताना आमदार शिरसाट म्हणाले, ‘एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यामुळे तुम्हाला सत्ता मिळाली हे विसरू नका. नाही तर १०५ आमदार असूनही तुम्हाला पुढील अडीच वर्षेही विरोधातच बसावे लागले असते.’ दुसरीकडे अजित पवार गटाचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ (chagan Bujbal) यांनीही ‘शिंदेसेनेला जितक्या जागा द्याल तितक्याच राष्ट्रवादीलाही द्याव्यात’ अशी अट घातली आहे. त्याला प्रत्त्युत्तर देणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनाही त्यांनी सुनावण्या मागेपुढे पाहिले नव्हते.
युतीत बंडखोरीचा धोका Threat of rebellion in Mahayuti
maharashtra-loksabha-controversy-over-seat-sharing-in-shiv-sena-bjp एकूणच भाजपकडून शिवसेना- राष्ट्रवादीवर मतदारसंघ सोडण्यासाठी जसजसा दबाव वाढत आहे तसतसे त्याचे पडसाद महायुतीच्या संबंधावर उमटत आहेत. एक-दोन दिवसांत युतीच्या नेत्यांना निर्णय घेऊन उमेदवार जाहीर करावे लागतील. मात्र भाजपचे आपला हट्ट कायम ठेवला तर मात्र महायुतीत बंडखोरीची लागण होण्याचा धोका कुणीही टाळू शकत नाही, असे राजकीय विश्लेषकांना वाटते.