Loksabha election-Raj Thackeray’s MNS declared Support to BJP
मुंबई : प्रत्येक मुद्द्यावर कोलांटउडी घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी आपल्या व्यक्तिमत्वाची ही खासियत यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही कायम ठेवली. गेली १० वर्षांपासून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आसुसलेल्या मनसे कार्यकर्त्यांच्या व इच्छूक उमेदवारांच्या आशेवर पाणी फेरत राज ठाकरे यांनी २०१९ प्रमाणे २०२४ चीही लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय गुढी पाडवा मेळाव्यात जाहीर केला. तसेच देशाच्या भवितव्यासाठी व खंबीर नेतृत्व असलेल्या नरेंद्र मोदींच्या Narendra Modi नेतृत्वासाठी भाजपच्या नेतृत्वातील महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. आता राज ठाकरेंचा मनसे पक्ष व कार्यकर्त्यांचा मुंबई, ठाणे, नाशिक या पट्ट्यात उद्धव ठाकरेंच्या Udhav Thackeray’s Candidates उमेदवारांना पराभूत करण्यासाठी भाजप वापर करुन घेईल.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार पायउतार होऊन एकनाथ शिंदे Eknath shinde- देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांचे सरकार आल्यापासूनच राज ठाकरे Raj Thackeray भाजपसोबत येणार असल्याचे संकेत मिळत होते. मात्र राज योग्य वेळेची वाट पाहात होते. लोकसभेच्या तोंडावर या हालचालींना गती आली. राज्यात शिंदे- फडणवीस यांच्याशी प्राथमिक बोलणी झाल्यानंतर राज ठाकरे यांनी थेट दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बंदद्वार चर्चा झाली. पण त्याची माहिती ना मनसे कार्यकर्त्यांना कळू शकली ना महाराष्ट्रातील जनतेला. अखेर गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी या चर्चेचा तपशील (आपल्या सोयीनुसार) जाहीर केला.
Loksabha election-Raj Thackeray’s MNS declared Support to BJP
आता राज ठाकरे यांनी या मेळाव्यात केलेली वक्तव्ये व त्यांचा राजकीय अर्थ जाणून घेऊ
१. कमळावर निवडणूक लढवा, हा भाजपचा प्रस्ताव राज ठाकरेंनी नाकारला.
राजकीय अर्थ : राज ठाकरे Raj Thackeray यांचा मनसे पक्ष MNS पक्षाला व रेल्वेचे इंजिन या निवडणूक चिन्हाला जनमाणसात फारशी किंमत राहिलेली नाही, अशीच अप्रत्यक्ष जाणीव अमित शाह Amit Shah यांनी करुन दिली. त्यामुळेच लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या ‘कमळा’वर लढण्याची ऑफर त्यांनी दिली. मात्र मनसेचे अस्तित्व टिकवण्यासाठी राज ठाकरे यांनी ही ऑफर नाकारली. आता लोकसभेला मनसेचा एखाद- दुसरा उमेदवार ‘कमळा’वर लढला असता, निवडूनही आला असता मात्र तो परत ‘मनसे’कडे आला असता का? याविषयी मात्र शंकाच होती.
२. लोकसभा लढणार नाही, विधानसभेच्या तयारीला लागला.. राज यांचे आवाहन Let’s Prepare for the assembly election
राजकीय अर्थ : केवळ निवडणुका आल्या की कार्यकर्त्यांमध्ये जाणारा नेता म्हणून आता राज ठाकरेंची ओळख निर्माण होत आहे. त्यांच्या सभेला गर्दी होते, पण त्याचे मतात रुपांतर होत नसल्याचे दिसून येते. आपल्या पक्षाची ताकद क्षीण झाली असल्याची त्यांनाही जाणीव आहे. म्हणूनच कार्यकर्ते, पदाधिकारी कितीही इच्छूक असले तरी लोकसभेची निवडणूक लढवणे मनसेच्या आवाक्यात नसल्याचे ओळखून राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतला. २००६ मध्ये पक्षस्थापना झाल्यानंतर मनसेने २००९ व २०१४ च्या निवडणुकात मोजक्या ठिकाणी उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांचा मतटक्का पहिल्या निवडणुकीत ४ टक्के तर दुसऱ्या निवडणुकीत दीड टक्क्यांपर्यंत घसरला होता. म्हणूनच २०१४ पासून त्यांनी लोकसभा निवडणूकच न लढवण्याचा निर्णय घेतला. तो यावेळीही कायम ठेवला. त्याच वेळी विधानसभेच्या तयारीला लागा असे आवाहन करत कार्यकर्ते व इच्छूकांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला.. मात्र भाजपला मदत करण्याच्या बदल्यात मनसेला एखादी राज्यसभेची जागा मिळू शकते, त्या माध्यमातून पक्षस्थापनेनंतर १८ वर्षांनी का होईना मनसेच्या खात्यात एखादी खासदारकी येऊ शकते.
३. राजकीय व्यभिचाराला थारा देऊ नका Do not support political adultery
राजकीय अर्थ : केवळ मुख्यमंत्रिपदाच्या लालसेने उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये भाजपची साथ सोडून काँग्रेस- राष्ट्रवादीच्या मदतीने सत्ता स्थापन केली. आजपर्यंत ज्या शिवसेनेने काँग्रेसविरोधात राजकारण केले, सत्तेसाठी त्यांच्यासोबत जाणे हा व्याभिचार असल्याचे राज ठाकरे यांना सांगायचे आहे. अनेक राजकीय नेत्यांचे व विश्लेषकांचेही तेच मत आहे. पण २०१४ च्या निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाचे गुणगाण करणाऱ्या, २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीला पाठिंबा देणाऱ्या व आता २०२४ मध्ये पुन्हा भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांची बदलती राजकीय भूमिकाही ‘राजकीय व्याभिचार’ नाही का? अस प्रश्न उपस्थित केला जात आहे. याचे उत्तर देताना मात्र राज ‘भारताच्या उज्वल भविष्यासाठी भाजपला पाठिंबा’ असा गोंडस शब्दप्रयोग करतात.
४. मोदींना पाठिंबा कशासाठी? Why support Modi?
राजकीय अर्थ : मोदी मुख्यमंत्री असल्यापासून राज ठाकरे त्यांचे कौतुक करतात. मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणूनही भूमिका राज यांनीच आधी मांडली होती. मात्र नंतर २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी ‘लाव रे ते व्हिडिओ’ म्हणून मोदींच्या आश्वासनांची पोलखोल केली. आता मरगळ आलेल्या मनसेला सत्तेचा परिसस्पर्श व्हावा म्हणून त्यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हे झाले राजकीय कारण. मात्र आपल्या निर्णयाचे समर्थन करताना भारताच्या उज्वल भविष्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आपण भाजपला पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरेंनी जाहीर केले.
५. शिवसेनाप्रमुख होणार नाही, मनसेलाच मोठी करणार Not become
Shiv Sena chief, MNS will make it bigger
राजकीय अर्थ : उद्धव ठाकरेंशी Udhav Thackeray न पटल्यामुळे २००५ मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली, ते पुन्हा कधीही परत न येण्यासाठीच. बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांच्या निधनानंतर या दोन्ही भावांनी एकत्र यावे म्हणून अनेकांनी प्रयत्न केले, मात्र दोघेही ताठर असल्याने त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आता शिवसेना फुटली असली तरी आपण कोणत्याही परिस्थितीत पुन्हा त्या पक्षात जाणार नाही असे स्पष्ट करुन राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख होण्याच्या वावड्यांना पूर्णविराम दिला. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचा ताबा असला तरी हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. उद्या फासे पलटले तर शिवसेना पक्ष व चिन्ह परत उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकते. एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्रीपद व शिवसेना नेतेपद हे अळवावरच्या पाण्यासारखे आहे हे राज ठाकरे जाणून आहेत. म्हणूनच पुन्हा त्या मार्गी न जाण्याचा निश्चय त्यांनी केला.
‘मी जन्माला घातलेला मनसे पक्ष व त्याचे रेल्वे इंजिन हे चिन्ह’ याबाबत तडजोड करणार नाही. हाच पक्ष मी मोठा करणार…’ राज ठाकरे यांचे एवढेच वाक्य गुढी पाडवा मेळाव्याला उपस्थित मनसैनिकांना आश्वासक वाटले, इतर आरोप- प्रत्यारोप व महाराष्ट्र हिताचे दावे ही केवळ भाषणबाजी असल्याचे आता लपून राहिलेले नाही.