ॲड. प्रकाश आंबेडकर यांची वेगळी वाट, तीन उमेदवार जाहीर; वंचितला आघाडीत घेण्यात अडचण कोणाची?

मविआतील काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तीन पक्षांच्या जागावाटपाच्या चार- पाच बैठका झाल्या, त्यात शेवटच्या २ बैठकांत वंचितचे प्रतिनिधीही हजर होते. हे सारे घडत असताना आमचा अजून आघाडीत समावेशच झाला नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

मुंबई : भाजपचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी आम्ही तयार आहोत, अशी भूमिका वंचित आघाडीचे नेते ॲड.  प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांनी यावेळी सुरुवातीपासून घेतली. आधी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी हातमिळवणी केली. नंतर मविआत प्रकाश आंबेडकरांना घेण्यासाठी ठाकरेंनी शरद पवार यांचीही ‘एनओसी’ घेतली. मात्र गेल्या महिनाभरापासून काँग्रेसचे नेते मात्र याबाबतचा निर्णय घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे वैतागलेल्या प्रकाश आंबेडकरांनी आता आघाडीतून नव्हे तर स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. रविवारी त्यांनी सोशल मीडियावर आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करुन यापुढे मविआच्या कार्यक्रमांना न जाण्याचे आवाहन केले आहे.

वंचितला घेण्यास काँग्रेसची आडकाठी

यावेळी प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar सुरुवातीपासूनच आघाडीत सहभागी होण्यासाठी इच्छूक दिसले. त्यांनी अगदी जाहीरपणे माध्यमांसमोर ही भूमिका बोलूनही दाखवली. मविआच्या बैठकीत त्यांच्या प्रतिनिधींना सहभागी करुन घेण्यात आले. सुरुवातीला वंचितने २७ जागांची अवास्तव मागणी केली, मात्र नंतर त्यात तडजोडीची तयारीही दर्शवली. मविआतील काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तीन पक्षांच्या जागावाटपाच्या चार- पाच बैठका झाल्या, त्यात शेवटच्या २ बैठकांत वंचितचे प्रतिनिधीही हजर होते. हे सारे घडत असताना आमचा अजून आघाडीत समावेशच झाला नसल्याचे प्रकाश आंबेडकर सांगत आहेत. म्हणजे शिवसेना व राष्ट्रवादी त्यांना मविआत घेण्यास तयारी असली तरी काँग्रेसने अजून हिरवा कंदिल दाखवलेला नाही. त्यांना अजून प्रकाश आंबेडकरांवर विश्वास वाटत नाही. मात्र यावेळी वंचित मविआसोबत आली नाही तर २०१९ प्रमाणे काही मतदारसंघात मविआला धर्मनिरपेक्ष मतांचा मोठा फटका बसू शकतो.

 

 

https://missionpolitics.com/union-home-minister-amit-shah-in-chhatrapati-sambhajinagar-today-ahead-of-lok-sabha-elections/