पवार कुटुंबांत भाऊबंदकी उफाळली; श्रीनिवास पवार संतापले, ‘अजित पवार नालायक माणूस’
बारामतीत बहिणीविरोधात बायकोला निवडणुकीत उभे करणाऱ्या दादांना घरातूनच मोठा विरोध
मुंबई – आपले काका शरद पवार यांच्याविरोधात बंड करुन भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार ajit pawar यांच्या विरोधात त्यांच्या कुटुंबातील बहुतांश सदस्यांनी रोष व्यक्त केला आहे. अजित पवार यांनी आपली पत्नी सुनेत्रा पवार यांना बहिण सुप्रिया सुळेंविरोधात निवडणूक मैदानात उतरवल्याने कुटुंबीय आणखी नाराज झाले आहेत. आता अजितदादांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनीही काकांशी बंड करणाऱ्या दादांना ‘नालायक’ संबोधले आहे.
यापूर्वी शरद पवार, सुप्रिया सुळे supriya sule यांच्याशिवाय चुलत भाऊ राजेंद्र पवार rajendra pawar, पुतण्या रोहित पवार rohit pawar, रोहितच्या आई सुनंदा पवार, दादांचा सख्खा भाऊ श्रीनिवास पवार, पुतण्या युगेंद्र पवार आदींनी अजित पवारांविरोधात भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे अजित पवारांसोबत फक्त त्यांच्या पत्नी व बारामती मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार, मुलगा जय व पार्थ हे चौघेच आहेत. ज्यांनी आपल्याला राजकारणात मोठ्या पदापर्यंत पोहोचवले त्या शरद पवारांविरोधात अजितदादांनी घेतलेली भूमिका कोणालाही पटलेली नाही. बारामतीतील पवारांच्या निकटवर्तीयांमधूनही हीच चर्चा आहे. दुसरीकडे, पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे, इंदापूरचे माजी आमदार व भाजप नेते हर्षवर्धन पाटील, भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनीही अजितदादांविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच दादांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.
शरद पवारांना घरी बसा म्हणणे पटत नाही : श्रीनिवास पवार Sharad Pawar doesn’t like being told to sit at home: Shrinivas Pawar
काटेवाडी (ता. बारामती) या आपल्या गावात ग्रामस्थांचा मेळावा घेऊन श्रीनिवास पवार यांनी आपण शरद पवारांसोबत असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘शरद पवारांविरोधात भूमिका घेणारे अजित पवार हे नालायक आहेत. जमीन आपल्या नावावर केली म्हणून त्यांना घराबाहेर काढायचे नाही. आपण औषध विकत आणतो तेव्हा त्यावर एक्सपायरी डेट असते. तशी नात्यांना देखील असते. आता वाईट वाटून घ्यायचे नाही. मला दबून जगायचे नाही तर स्वाभिमानाने जगायचे आहे. शरद पवारांमुळेच पदे मिळाली आहेत. त्याच साहेबांना आता तुम्ही घरी बसा, कीर्तन करा, असे म्हणत आहात. हे माझ्या मनाला पटत नाही.’ दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही श्रीनिवास पवारांची भूमिका आपल्या पटली असल्याचे स्पष्ट केले.
मी शरद पवारांचे ऐकून राजकारणापासून दूर राहिलो : राजेंद्र पवार I stayed away from politics by listening to Sharad Pawar: Rajendra Pawar
यापूर्वी अजितदादांचे चुलत बंधू व रोहित पवार यांचे वडिल राजेंद्र पवार यांनीही एक पत्र लिहून अजितदादांच्या भूमिकेला विरोध केला होता. या पत्रात राजेंद्र यांनी लिहिले होते की, ‘जर मी तेव्हा राजकारणात आलो असतो तर तुम्हाला आज तेव्हाच पवार घराण्यात फूट पडल्याचे दिसले असते. मात्र मी ते केले नाही. मलाही त्यावेळी कारखान्याची निवडणूक लढायची होती. पण शरद पवारांनी मला थांबवले व व्यवसायात लक्ष घालण्यास सांगितले. त्यानंतर अजित पवार राजकारणात आले. त्यानंतर ते पुढे गेले. मी सतत राजकारणात राहिलो असतो तर शेतीकडे दुर्लक्ष झाले असते. मात्र मी सामाजिक कामं करत राहिलो. बारामती अॅग्रोचं काम पाहिलं. व्यवसायाचा पाया पक्का केला. त्यानंतर रोहित पवारांना हा पक्का केलेला पाया मी दिला.’
दादांचे मौन, पण मिटकरींची पवारांवर टीका
Dada’s silence, but Mitkari slams Pawar
सख्ख्या भावाकडून टीका झाल्यानंतर अजित पवारांनी त्याला उत्तर देणे टाळले. मात्र अजितदादा गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी शरद पवारांचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, ‘सख्ख्या भावांना एकमेकाविरुद्ध उभे करण्याचा कुटिल डाव खेळून निवडणूक जिंकू असे त्यांना वाटत असेल तर हा तुमच्या भ्रमाचा भोपळा आहे, हे वरिष्ठांनी लक्षात घेतले पाहिजे. अजित पवार आतल्या गाठीचे राजकारणी नाहीत. त्यांना डाव, कपट जमत नाही. आम्ही रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस करू. तुम्ही प्रतिष्ठेचा मुद्दा केला तर आम्हीही सुनेत्रा पवारांचा विजय खेचून आणणार. द्रोणाचार्य, शकुनीमामाचा नि:पात करणार.’