शिंदे-अजितदादा सोबत असूनही भाजपला मिशन ४५ ची शंका; म्हणून राज ठाकरेंच्या मनसेला महायुतीत घेणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व राज ठाकरे यांची सुमारे ४० मिनिटे चर्चा झाली. लवकरच युतीबाबत अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे समजते.

Maharashtra Politics-Now MNS Also in NDA

नवी दिल्ली : यंदा काहीही झाले तरी देशात ४०० व महाराष्ट्रात ४५ Bjp’s Mission 45 खासदार निवडून आणण्याचे भाजपचे ध्येय आहे. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची, कोणत्याही पक्षाला सोबत घेण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला MNS in Mahayuti महायुतीत घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर १९ मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह Amit Shah व राज ठाकरे Raj Thackeray यांची सुमारे ४० मिनिटे चर्चा झाली. लवकरच युतीबाबत अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे समजते.

राज ठाकरेंना सोबत घेण्याच्या निर्णयामुळेच महायुतीचे जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही. आता आज- उद्या नव्या युतीची घोषणा होऊन ही प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. राज ठाकरे Raj Thackeray  यांना दक्षिण मुंबई व शिर्डी या दोन जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा आहे. नाशिकवरह त्यांनी दावा केला होता. मात्र शिंदेसेना ही जागा सोडण्यास तयार नाही.

राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी माजी आमदार बाळा नांदगावकर Bala Nandgaokar will be candidate in mumbai or shirdi यांना शिर्डी किंवा दक्षिण मुंबई मतदारसंघातून भाजप खासदार करेल. त्यामोबदल्यात मुंबईतील सर्व लोकसभा मतदारसंघात मनसे महायुतीच्या उमेदवारांना मदत करेल, अशी डील ठरल्याचे कळते.

का हवीय भाजपला मनसेची साथ Why does BJP want the support of MNS?

महाराष्ट्राच सत्ता मिळवण्यासाठी भाजपने आधी शिवसेना फोडून एकनाथ शिंदेंना Eknath Shinde मुख्यमंत्री कले. मात्र वर्षभरात शिंदेंचे नेतृत्व महाराष्ट्रात अपेक्षित प्रभाव पाडू शकलेले नसल्याचे भाजपच्याच सर्व्हेतून समोर आले. त्यामुळे एका वर्षानंतर भाजपने राष्ट्रवादी फोडून अजितदादा गटाला Ajit Pawar सत्तेत भागीदार करुन घेतले. त्यांचा उद्देश एकच होता महाराष्ट्रात लोकसभेच्या ४५ जागा निवडून आणणे. पण अजितदादांना सोबत घेऊन सहा महिने उलटल्यानंतर भाजपने जनतेत जाऊन पुन्हा सर्व्हे केला तरी शिंदेप्रमाणे अजितदादाही जनतेत फार प्रभावी ठरत नसल्याचे निष्कर्ष बाहेर आले.

खासगी सर्व्हेक्षण संस्था सी व्होटरने फेब्रुवारीत केलेल्या पाहणीत महाविकास आघाडीला २५ ते २६ व महायुतीला लोकसभेच्या २० जागांवरच विजय मिळत असल्याचे अंदाज वर्तवण्यात आले होते. त्याउलट उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याविषय जनतेत सहानुभूती वाढत असल्याचे वास्तव समोर आले. हे पाहून भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या पोटात गोळा उठला. काहीही झाले तरी मिशन ४५ पूर्ण करायचेच, यासाठी मग त्यांनी आधीपासूनच जवळीक निर्माण केलेल्या राज ठाकरेंशी Raj Thackeray हातमिळवणीचा निर्णय घेतला.

https://missionpolitics.com/loksabha-election-bjps-mission-45-likely-to-fail-in-maharashtra/

 

फडणवीस- शेलार यांचा पुढाकार Fadnavis- Shelar’s initiative For MNS

अजित पवार यांना महायुतीत घेण्यास प्रदेश भाजपमधील नेते उत्सुक नव्हते. काहींचा तर तीव्र विरोध होता. पण भाजप हायकमांडच्या हट्टापायी ते काही बोलू शकले नाहीत. आता मात्र राज ठाकरेंना सोबत घेण्याठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे ६ महिन्यांपासून फिल्डिंग लावत होते. अखेर त्यांना यश आल्याचे दिसत आहे.

का हवाय ठाकरे ब्रॅन्ड? Why Thackeray brand?

खरे तर राज ठाकरे यांचा राज्यात एकही खासदार नाही. कारण २०१९ मध्ये मनसे लोकसभा निवडणूकच लढला नाही. उलट त्या काळात राज ठाकरे यांनी मोदींच्या कारभाराची जाहीर सभांमधून पोलखोल करत काँग्रेस- राष्ट्रवादीच्या उमेदवारांना अप्रत्यक्ष मदतच केली होती. मात्र तरीही भाजप- शिवसेना युतीचे ४१ तर काँग्रेस- राष्ट्रवादीचे अवघे ५ खासदार निवडून आले होते. बरं, मनसेचा आमदारही एकच, तोही कल्याण ग्रामीण मतदारसंघातून. म्हणजे आमदारसंख्येचेही फारसे पाठबळ नाही. मुंबई मनपात त्यांचे ७ नगरसेवकच निवडून आले होते. अल्पकाळातच त्यापैकी ६ जण उद्धव ठाकरेंसोबत गेले. म्हणजे एकच आमदार व मुंबईतील एका नगरसेवकाचा पक्ष असलेला मनसेची भाजपला एवढी गरज का भासते हे आपण जाणून घेऊ…

  • राज ठाकरे हे प्रभावी वक्तृत्व असलेले नेते आहेत. लोकभावनेला हात घालू शकतील असे मुद्दे ते आपल्या भाषणात मांडतात. त्यांना एेकण्यासाठी नेहमी गर्दी होते, पण त्याचे मतात रुपांतर होत नाही. असे असले तरी भाजपसोबत आल्यानंतर या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये होऊ शकते असे भाजपला वाटते.
  • दोन्ही पक्ष फोडल्यानंतरही राज्यात भाजपची ताकद वाढली असली तरी जनतेत उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याविषयी सहानुभूती आहे. विशेष: मुंबईत ठाकरेंचे वलय कमी झालेले नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत त्याचा भाजप- शिंदेसेनेला फटका बसू नये म्हणून इथे भाजपा मनसे हवी आहे. जिथे जिथे उद्धव सेनेचे तगडे उमेदवार आहेत त्या मतदारसंघात मनसेची ताकद व मतदार महायुतीकडे वळली तर काठावर पराभवाच्या छायेत असलेले मतदारसंघ महायुतीला मिळू शकतील, असे भाजपला वाटते
  • उद्धव ठाकरेंशी बंड केल्यामुळे एकनाथ शिंदे काही काळ चांगले चर्चेत राहिले. मात्र आता त्यांच्या भूमिकेविषयीच जनतेला शंका वाटत आहे. शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह शिंदेंना मिळाले असले तर त्यामागे ठाकरे नावाची लोकप्रियता नसल्यामुळे पक्षाच्या यशाविषयी त्यांना शंका वाटते. त्यामुळेच आमच्यासोबत उद्धव नसले तरी राज ठाकरे आहेत हे निवडणूक काळात जनतेला पटवून बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या जनतेची मते आपल्याकडे खेचून घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनाही ठाकरे ब्रॅन्ड सोबत हवा आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे व राज यांच्यात ८ ते १० वेळा भेटी झाल्यात, त्यातही याच नव्या युतीची साखरपेरणी केली जात होती, असे राजकीय विश्लेषकांना वाटते.

मनसेकडे मतदान २.५ टक्केच, पण तेही भाजपला सोडायचे नाही Vote Share of MNS is Only 2.5 %

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने २८८ पैकी १०१ मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. त्यापैकी एकच आमदार निवडून आला, बाकी १०० उमेदवार पराभूत झाले. ८६ जणांचे तर डिपॉझिट जप्त झाले. या निवडणुकीत मनसेला २.२५ टक्के मतदान झाले. इतर प्रादेशिक पक्षांचा विचार करता हे मतदान खूपच कमी आहे. मात्र भाजपला महाराष्ट्रात एक- एक जागा महत्त्वाची असल्याने त्यांना हे २.२५ टक्के मतदानही सोडायचे नाही. म्हणूनच अमित शाह यांनी पुढाकार घेऊन राज ठाकरेंना महायुतीत घेण्याच्या चर्चेसाठी दिल्लीत बोलावले होते.

विधानसभा, मुंबई महापालिकेत होऊ शकतो फायदा Benefit to Mumbai Municipality, Legislative Assembly

लोकसभेला मनसेचा एक खासदार निवडून आणण्याची जबाबदारी महायुतीने घेतली तर त्यामोबदल्यात भाजप, शिंदेसेना व अजित पवार गटाला मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, संभाजीनगर या पट्ट्यात मनसेची चांगली मदत होऊ शकते. विधानसभेलाही जिथे उद्धव सेनेचे तगडे उमेदवार आहेत तिथे मनसेच्या पाठिंब्याचा महायुतीला फायदा होऊ शकते. विशेष म्हणजे मुंबई मनपातील उद्धव ठाकरेंची २५ ते ३० वर्षांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी मनसेचा उपयेाग करुन घेण्याची भाजपची रणनिती आहे. उद्धव सेनेच्या उमेदवारांविरोधात मनसेला उतरवण्याची किंवा त्यांची मराठी मते फोडण्यासाठी मनसेचा उपयेाग करुन घेण्याची भाजपची रणनिती आहे.

मनसे उत्तर भारतीयविरोधी, पण ती रिस्कही घेण्यास भाजप तयार MNS is anti- North Indian

राज ठाकरेंचा मनसे पक्ष उत्तर भारतीय म्हणून ओळखला जातो. तशी त्यांची देशभर प्रतिमा आहे. दुसरीकडे मुंबईतील उत्तर भारतीय मतदार हा भाजपसोबत आहे. मग राज ठाकरेंना महाुतीत घेतल्यास उत्तर भारतीय मतदार भाजपपासून दुरावला जाऊ शकतो, अशी शंका व्यक्त होत आहे. मात्र आता राज ठाकरेंचे विचार सर्वसमावेशक व भाजपशी मिळते जुळते झाले आहेत. त्यामुळे ते उत्तर भारतीयांविरोधात भूमिका घेणार नसल्याचे भाजप नेत्यांकडून सांगितले जाते. गेल्या वर्षीच उत्तर प्रदेशमधील भाजपचे वादग्रस्त खासदार ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंना अयोध्येत येण्यास या कारणावरुन बंदी घातली होती.

मात्र दीर्घकालीन विचार करुनच भाजप राज ठाकरेंशी हातमिळवणी करण्यास उतावीळ झाली आहे. त्यासाठी राज ठाकरेंनी यापूर्वी पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्याविरोधात घेतलेली भूमिकाही ते विसरलेले आहेत.