अशोक चव्हाण यांना का आवडले भाजपचे ‘कमळ’ (Ashok Chavan joins BJP)
मुंबई : काँग्रेसचा राजीनामा देणारे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी १३ फेब्रुवारी रोजी भाजपात प्रवेश केला. (Ashok Chavan joins BJP). उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis wel comes Ashok Chavan) व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी त्यांचे स्वागत केले.
‘कुठल्याही पदाच्या अपेक्षेने मी भाजपात आलेलो नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi’s Work Impresssed Ashok Chavan) करत असलेल्या कामामुळे मी प्रभावित झालो आहे. देशहिताच्या या कामात आपलाही सहभाग असावा म्हणून मी भाजपात प्रवेश केला,’ असे स्पष्टीकरण चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिले.
अशोक चव्हाण यांच्यासोबतच नांदेडचे माजी आमदार अमरनाथ राजूरकर (Former MLC Amar Rajurkar Joins BJP) यांनीही भाजपात प्रवेश केला. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात हा कार्यक्रम झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले, ‘अशोक चव्हाण यांच्या राजकीय व प्रशासकीय अनुभवाचा भाजपला, राज्याला व देशाला निश्चित फायदा होईल.’
पत्रकार परिषदेतील प्रश्नोत्तरे :
प्रश्न : अशोक चव्हाणांना राज्यसभेवर पाठवणार का? (Will Ashok chavn goes to Rajya sabha)
फडणवीस : महाराष्ट्रातून राज्यसभेवर कुणाला पाठवायचे याचा निर्णय केंद्रीय भाजप नेतृत्व घेईल. त्यांची नावे जाहीर झाली की तुम्हाला समजतीलच.
प्रश्न : अशोक चव्हाणांसोबत अजून काँग्रेसचे किती आमदार भाजपात येणार आहेत.
अशोक चव्हाण : मी कुणालाही माझ्यासोबत येण्यास सांगितलेले नाही की माझे कुणाशी या संदर्भात बोलणेही झालेले नाही. आता पुढचे काय करायचे ते देवेंद्र फडणवीस बघून घेतील.
फडणवीस : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपचे जे काम सुरु आहे त्या मुख्य प्रवाहात जे जे कुणी सहभागी होऊ इच्छितात त्यांना आम्ही सोबत घेणार आहोत.
प्रश्न : अशोक चव्हाण यांना कुठले पद देणार?
फडणवीस : दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण यांचा अनुभव मोठा आहे. त्यांची कुठे मदत घ्यायची हे आम्हाला चांगले माहित आहे. योग्य वेळी आम्ही ती घेऊ.
प्रश्न : आदर्श घोटाळ्यामुळे (Adarsh Socity Scam) तुम्ही भाजपात प्रवेश केला असा आरोप होत आहे?
अशोक चव्हाण : आदर्श घोटाळा हा एक ‘अपघात’ होता असे मी म्हणेन. उच्च न्यायालयाने या प्रकरणात आमच्याकडून निर्णय दिला आहे. काही लोक त्यात अपिलात गेले आहेत, मात्र त्याचा आणि भाजप प्रवेशाचा काहीही संबंध नाही.
प्रश्न : इतरांचे पक्ष फोडल्याशिवाय भाजपला निवडणूक जिंकता येत नाही, असा आरोप काँग्रेसचे नेते करत आहेत?
फडणवीस : मी उलटं म्हणेन. काँग्रेसलाच त्यांचा पक्ष सांभाळता येत नाही. नाही तर ४०- ५० वर्षे ज्यांनी त्या पक्षात हयात घालवली तेच आज काँग्रेसची साथ का सोडत आहेत याचे त्यांनीच आत्मचिंतन करायला हवे.
myki shorrock