Baramati Loksabha : प्रतिस्पर्धी उमेदवार सुनेत्रा पवार, भाचा पार्थ पवारांचे सुप्रिया सुळे यांच्यावर ५५ लाखांचे कर्ज

सुप्रिया सुळे- सदानंद सुळेंचे उत्पन्न गतवर्षीच्या तुलनेत ६० कोटींनी घटले तर सुनेत्रा वहिनींपेक्षा अजितदादा गरीब

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे supriya Sule व प्रतिस्पर्धी उमेदवार सुनेत्रा अजित पवार Sunetra Ajit pawar यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या दोघींनीही दाखल केलेल्या शपथपत्रानुसारaffidavit रंजक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत पवार कुटुंबीय एकत्र असताना या परिवारातील अनेक सदस्यांमध्ये सामोपचाराने आर्थिक व्यवहार झाले होते. किमान कागदोपत्री तरी तसे दाखवले जात होते. मात्र आता पक्षफुटीनंतर पवार कुटुंबात मोठी फूट पडली. त्यामुळे सुनेत्रा व सुप्रिया एकमेकाविरोधात निवडणुकीत उभ्या राहिल्या. मात्र सुप्रियांच्या शपथपत्रातील affidavit माहितीनुसार, ज्यांच्याविरोधात त्या निवडणूक लढवत आहेत त्या अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा sunetra pawar यांच्याकडून सुप्रियांनी supriya sule ३५ लाख रुपये यापूर्वीच कर्जाऊ घेतल्याचे समोर आले आहे. तसेच अजितदादांचे पूत्र पार्थ यांच्याकडूनही सुप्रियांनी २० लाख रुपये कर्जाऊ घेतलेले आहेत. इतर परिवारात आर्थिक व्यवहारावरुन किंवा संपत्तीवरुन वाद होत असल्याची अनेक उदाहरणे आपण पाहिली अाहेत. मात्र राजकीय वर्चस्वासाठी फूट पडलेल्या पवार कुटुंबातील प्रतिस्पर्धी गटांमध्ये अजूनही लाखो रुपयांचे व्यवहार मात्र ‘सुरळीत’ सुरु असल्याचे यावरुन दिसून येते. दरम्यान, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुप्रिया सुळे supriya sule आणि त्यांचे पती सदानंद सुळे sadaand sule यांच्या उत्पन्नामध्ये २०२१-२२ या वर्षाच्या तुलनेत २०२२-२३ या वर्षात सुमारे ६० कोटी रुपयांची घट झाल्याचेही त्यांनी स्वत:च शपथपत्रात म्हटले आहे.

supriya sule’s property
सुप्रियांकडे २,६१,७५,००० रुपयांचे दागदागिने आहेत. यात सोने : १ कोटींचे तर चांदी : ४,५३,४४६ रुपयांची आहे.
एक कोटी ५६ लाख रुपयांचे हिरे त्यांच्या तिजोरीत आहेत.
सुप्रिया यांचे २०२१-२२ या आर्थिक वर्षात उत्पन्न ३४ कोटी ५६ लाख ८० हजार ५२० रुपये होते. मात्र २०२२-२३ या आर्थिक वर्षात ते १ कोटी ७८ लाख ९७ हजार ४६० रुपयांपर्यंत घटले. म्हणजे त्यात सुमारे ३३ कोटी रुपयांनी घट झाली. सुप्रिया सुळेंकडे ३८,०६,४८,४३१ रुपयांची जंगम, तर ९,१५,३१,२४८ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
सदानंद सुळेंचे उत्पन्नही २७ कोटींनी कमी झाल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. २०२१-२२मध्ये सदानंद यांचे वार्षिक उत्पन्न ३१ कोटी ४३ लाख ३४ हजार ७२० रुपये होते. २०२२-२३ या वर्षात ते: ३ कोटी ९० लाख २ हजार २२० रुपये झाले.
महत्त्वाचे म्हणजे शेअर्स, बंधपत्रे, म्युच्युअल फंडात १६ कोटी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या सुप्रियांकडे स्वत:च्या मालकीचे एकही वाहन नाही. मात्र विदेशी बँकांत त्यांच्या साडेतीन कोटी रुपयांच्या ठेवी मात्र आहेत.

सुनेत्रा वहिनींपेक्षा अजितदादा गरीब

सुनेत्रा पवार sunetra pawar’s property व अजितदादांची ajit pawar’s propety एकत्रित जंगम मालमत्ता २५.८१ कोटी आहे. २०१९ मध्ये ती २०.६८ कोटी होती.
अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांकडे ४४ एकर शेती आहे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या अजित पवारांच्या नावावर मात्र फक्त ४ एकरच शेती आहे.
सुनेत्रा यांच्याकडे १०३ तोळे सोन्याचे दागिने हिरे आहेत. दादांच्या नावावर मात्र एक ग्रॅमही सोने नाही.
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या व अनेक कंपन्यांच्या संचालक असलेल्या सुनेत्रा यांचे २०१९ मध्ये वार्षिक उत्पन्न ३ कोटी २३ लाख रुपये होते. तर २०२४ मध्ये ते ४ कोटी २२ लाख रुपयांपर्यंत वाढले.
वार्षिक उत्पन्नाच्या बाबतीतही अजित पवार पत्नीपेक्षा ‘गरीब’ आहेत. अजितदादांचे २०१९ मध्ये वार्षिक उत्पन्न ६२ लाख ४८ हजार रुपये होते. २०२४ मध्ये ते ८० लाखांपर्यंत वाढले. पण सुनेत्रा वहिनीपेक्षा सुमारे ३ कोटींनी अजितदादा गरीबच असल्याचे कागदाेपत्री समोर आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics