नाशिक लोकसभा : अमित शाह यांनी जाहीर केलेले भुजबळांचे तिकीट एकनाथ शिंदेंनी कापले

Nasik Loksabha- Eknath Shinde cut Bhujbal's ticket announced by Amit Shah मुख्यमंत्री शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे नाशकात हेमंत गाेडसेंच्या उमेदवारीसाठी होते जास्त आग्रही

Nasik Loksabha- Eknath Shinde cut Bhujbal’s ticket announced by Amit Shah
मुंबई : भाजप व शिंदेसेनेच्या रस्सीखेचीत अडकून पडलेल्या एकेका लोकसभा मतदारसंघातील जागावाटपाचे कोडे आता सुटू लागले आहे. कोकणातील रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघावर सुरुवातीपासून दावा करणारे शिंदेसेनेेचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी आश्चर्यकारकरित्या माघार घेतली अन‌् भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane in Bjp’s candidate in Ratnagiri- Sindhudurg यांना तेथून उमेदवारी जाहीर झाली. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal’s withdrawal from the Lok Sabha elections यांनीही नाशिकच्या मैदानातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे शिंदेसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने अंतर्गत सर्व्हेक्षणाचे कारण पुढे करत शिंदेसेनेच्या ४ खासदारांची तिकिटे कापण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना Eknath Shinde भाग पाडले होते. आता नाशिकवरही त्यांचा डोळा होता. मात्र आता काहीही झाले तरी हक्काच्या जागा गमवायच्या नाहीत, यासाठी शिंदेसेनेकडून मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढत होता. दुसरीकडे, अमित शाह यांनीच नाशिकमधून छगन भुजबळ Changan bujbal यांना उमेदवारी द्यावी, असे आदेश काढले होते. तरीही शिंदेंनी शेवटपर्यंत दबाव वाढवल्यामुळे भुजबळांना भाजपच्या सूचनेवरुन एेनवेळी नाशिकच्या उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. ही जागा हेमंत गोडसेंनाच मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांचे पूत्र श्रीकांत शिंदे Shrikant shinde हे जास्त आग्रही होते, अशी माहिती समोर आली आहे.

शिंदे आक्रमक का झाले? Why did Shinde become aggressive?

२०१९ मध्ये शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते. बंडानंतर त्यापैकी १३ जण शिंदेसोबत आले तर ५ खासदार उद्धव ठाकरेंसोबत Udhav Thackeray एकनिष्ठ राहिले. आता आमचे खासदार असलेल्या सर्व म्हणजे १३ जागा शिवसेनेला राहाव्यात, यासाठी शिंदेसेनेचे नेते आग्रही होते. मात्र भाजपने अंतर्गत सर्व्हेचा हवाला देत यापैकी काही मतदारसंघावर आपला कब्जा करण्याची तयारी सुरु केली होती. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाचा पेच निर्माण झाला तो अजूनही सुटलेला नाही.
भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर दबाव येत असूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र आपली बाजू लावून धरली. भाजपच्या दबावामुळे त्यांना रामटेकमध्ये कृपाल तुमाने, यवतमाळमध्ये भावना गवळी, हिंगोलीत हेमंत पाटील व वायव्य मुंबईत गजानन किर्तीकर यांची उमेदवारी कापावी लागली. त्यामुळे शिंदेसेनेत नाराजीचे वातावरण होते. किमान यापुढे तरी भाजपच्या दबावापुढे झुकायचे नाही असा निर्धार शिंदेंनी केला व आपल्या हक्काची एकेक जागा पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती.

महायुतीत जागावाटपाचा पेच कायम

छत्रपती संभाजीनगर, नाशिक, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, ठाणे, कल्याण, पालघर व मुंबईतील तीन लोकसभा मतदारसंघावरुन भाजप व शिंदेसेनेत रस्सीखेच सुरु होती. दोन टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया सुरु झाली तरी हा वाद मिटत नव्हता. अखेर भाजपनेही थोडी पडती बाजू घेत शिंदेंच्या काही मागण्या मान्य केल्या व शिंदेंनीही काही तडजोडी करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे काही जागांवरील तिढा सुटण्यास मदत झाली.
रत्नागिरी मतदारसंघ अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे आहे. पण तेथील विद्यमान खासदार विनायक राऊत हे उद्धव सेनेकडे आहेत. त्यामुळे ही जागा यावेळी भाजपला मिळावी, यासाठी केंद्रीय नेत्यांनी दबाव टाकला होता. पण शिंदेसेनेचे ज्येष्ठ मंत्री उदय सामंत हे आपले बंधू किरण सामंत यांना तेथून उमेदवारी देण्याच्या तयारीत होते. त्यांच्यासाठी शिंदेंनी ही जागा मिळवणे प्रतिष्ठेचे केले होते. दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणेंसाठी Narayan Rane भाजपला ही जागा हवी होती. या लढाईत अखेर शिंदेंना माघार घ्यावी लागली. राणेंसाठी भाजपने इथून उमेदवारी जाहीर केली. शिंदेंच्या या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून शिवसेनेेचा बालेकिल्ला राहिलेल्या तळकोकणातून यंदा मात्र ‘धनुष्यबाण’ गायब झाला आहे.

नाशकात गोडसेंचा मार्ग मोकळा Clear the way for Hemant Godse in Nashik

आता रत्नागिरीची जागा भाजपला सोडल्यामुळे नाशिक, संभाजीनगरची जागा शिंदेसेनेकडेच राहिल असे आडाखे बांधले जात आहेत. शिंदेसेनेच्या मंत्र्यांकडून तसे दावेही केले जात आहेत. मात्र साताऱ्याची अजित पवार गटाची जागा भाजपने उदयनराजेंसाठी घेतल्यामुळे त्याची भरपाई नाशिकमध्ये करुन छगन भुजबळांना तेथून उमेदवारी देण्याचा शब्द अमित शाह यांनी दिला होता. स्वत: भुजबळांनी व फडणवीसांनी तसे अनेकदा सांगितले. मात्र शिंदेसेनेने शेवटपर्यंत ते मान्य केले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे यांनी तर नाशकात येऊन खासदार हेमंत गोडसेच नाशिकमधून उमेदवार राहतील असे आधीच जाहीर करुन भुजबळांची कोंडी केली होती. अखेर महायुतीत तणाव वाढत असल्यामुळे भाजपच्या सूचनेनुसार भुजबळांनी आपण माघार घेत असल्याचे जाहीर केले. परिणामी आता गोडसेंच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला.

संभाजीनगरमध्ये संभ्रम कायम Confusion continues in Sambhajinagar

रत्नागिरी, नाशिकचा पेच सुटल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते छत्रपती संभाजीनगरच्या जागेकडे. हा मतदारसंघही वर्षानुवर्षे शिवसेनेेकडे होता. मात्र २०१९ मध्ये इथून शिवसेना पराभूत झाली. त्यामुळे आता भाजपने या मतदारसंघावर ‘मेरिट’च्या आधारे दावा केला होता. केंद्रीय मंत्री भागवत कराड, राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांची नावे चर्चेत होती. पण शिंदेसेनेने या मतदारसंघावरचा दावा सोडण्यासही नकार दिला. आता रत्नागिरीची जागेच्या बदल्यात नाशिक शिंदेसेेनेला मिळाले, मुंबईतील काही जागांच्या बदल्यात भाजप संभाजीनगरही शिंदेसेनेसाठी सोडेल. येथील पालकमंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी मिळेल, असे शिंदेसेनेतून सांगितले जाते आहे. Minister Sandipan Bhumare will be Sihv sena’s candidate in Sambajinagar.  मात्र अजूनही भुमरेंची अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही.