मोदी-  शाह यांचे महाराष्ट्रात ‘मिशन ४५’ चे स्वप्न भंगणार; महायुतीचे फक्त २८ तर मविआचे २० खासदार निवडून येणार

महायुतीच्या भवितव्याची चिंता करताना एकनाथ शिंदे, अजित पवार व देवेंद्र फडणवीस.

Loksabha election - BJP's Mission 45 likely to fail in Maharashtra एबीपी माझा व सी व्होटर या संस्थांनी केलेल्या सर्व्हेक्षणात मोदी- शाह यांची झोप उडवणारे निष्कर्ष बाहेर आले आहेत. त्यामुळे उर्वरित उमेदवार जाहीर करण्यापूर्वी भाजपला महायुतीची रणनिती बदलावर भर द्यावा लागेल असेच दिसते.

Loksabha election – BJP’s Mission 45 likely to fail in Maharashtra

मुंबई : महाराष्ट्रात ४५ खासदार निवडून आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह Amit Shah या दोन नेत्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या भाजपचे मनसुबे राज्यातील जनता मात्र यंदा उधळून लावणार असल्याचे दिसते. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी एबीपी माझा व सी व्होटर (ABP Majha – C Voter Survey) या संस्थांनी केलेल्या सर्व्हेक्षणात मोदी- शाह यांची झोप उडवणारे निष्कर्ष बाहेर आले आहेत. त्यामुळे उर्वरित उमेदवार जाहीर करण्यापूर्वी भाजपला महायुतीची रणनिती बदलावर भर द्यावा लागेल असेच दिसते.

मिशन ४५ पूर्ण करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथी घडवून आणल्या. जून २०२२ मध्ये शिवसेनेत बंड घडवून आणून उद्धव ठाकरेंच्या Udhav Thackeray नेतृत्वातील सरकार पायउतार करणे हा त्यातलाच पहिला टप्पा. ही मोहिम भाजपने यशस्वीपणे पार पाडली. सुमारे वर्षभर एकनाथ शिंदे- फडणवीस (Eknath Shinde and Fadanvis Government) सरकारचा संसार सुरळीपणे पार पाडला. मात्र नंतर भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेत एकनाथ शिंदे Eknath Shinde यांची बंडखोरी भाजपला काहीच फायद्याच ठरत नसल्याचे निष्कर्ष आले. काही खासगी संस्थांनी केलेल्या पाहणीतही हेच समोर आले. उलट शिवसेनेत फूट पाडल्यामुळे उद्धव ठाकरेंविषयी जनतेत सहानुभूती वाढत गेली. हे पाहून भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या पोटात गोळा उठला.

त्यामुळे वर्षभराने म्हणजे जुलै २०२३ मध्ये भाजपने दुसरा डाव खेळला. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत फूट (Split in Ncp) पाडून त्यांनाही सत्तेचा वाटा दिला. मात्र ९ महिन्यात दादा गटाचाही फारसा फायदा होत नसल्याचे भाजपच्याच अंतर्गत सर्व्हेक्षणातून स्पष्ट झाले. त्यामुळे भाजपचे मिशन ४५ Bjp Mission 45  स्वप्न भंगणार हे सांगण्यासाठी आता कोणा भविष्यकाराची गरज राहिलेली नाही.

Loksabha election – BJP’s Mission 45 likely to fail in Maharashtra

महायुतीचे २८ खासदार शक्य

एबीपी माझा व सी व्होटर यांनी नुकत्याच केलेल्या सर्व्हेत  ABP Majha – C Voter Survey भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला म्हणजे एनडीएला महाराष्ट्रात फक्त ४८ पैकी २८ जागांवर यश मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजे टार्गेटपेक्षा ४० % कमी रिझल्ट लागण्यो संकेत यातून मिळत आहेत. २०१९ मध्ये महायुतीला ४१ जागा मिळाल्या होत्या.  त्या्तही १४ जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे.

ABP Majha – C Voter Survey

  • Mahayuti Allaince या संभाव्य २८ जागांपैकी २२ जागा एकट्या भाजपच्या असतील व उर्वरित फक्त ६ मतदारसंघात शिंदेसेना व अजितदादा गटाचे खासदार निवडून येऊ शकतात. म्हणजेच दोघांचे प्रत्येकी ३ किंवा ४-२ अशी स्थिती निर्माण होऊ शकते. म्हणजेच २०१९ मध्ये भाजपने २५ जागा लढवून २३ खासदार निवडून आणले होते. आताही तेवढीच कामगिरी हा पक्ष करु शकतो.
  • २०१९ मध्ये ज्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात व भाजपच्या युतीत १८ जागा मिळवल्या, त्या पक्षाला आता शिंदेंच्या नेतृत्वात फक्त ३ जागा मिळण्याची चिन्हे आहेत. म्हणजे शिंदेंचे बंड जनता स्वीकारण्यास तयार नाही. असा त्याचा अर्थ काढता येईल.
  • शरद पवार यांच्या नेतृत्वातील एकसंघ राष्ट्रवादीने २०१९ मध्ये चारच जागा जिंकल्या होत्या. पक्षात फूट पाडून नवे नेतृत्व उदयास आलेल्या अजितदादांना तेवढीही कामगिरी करता येणार नसल्याचे या सर्व्हेच्या अंदाजातून समोर येते.
  • Loksabha election – BJP’s Mission 45 likely to fail in Maharashtra

महाविकास आघाडीला २० जागा शक्य

फेब्रुवारी महिन्यात सी व्होटरने केलेल्या सर्व्हेत महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र आता महिनाभरातच महाविकास आघाडीच्या जागा काहीशा घटणार असल्याचे ताज्या पाहणीतून स्पष्ट झाले आहे.

अहवालानुसार, उद्धव सेना व शरद पवार गटाला मिळून १६ जागांवर यश येऊ शकते. यात ठाकरे गटाला १० तर पवार गटाला ६ असे असू शकते. किंवा एखाद दुसरी जागा कमी जास्तही होऊ शकते. तर काँग्रेसचे ४ खासदार निवडून येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

२०१९ च्या तुलनेत काँग्रेसचा हा चौपट फायदा म्हणावा लागेल. त्यावेळी काँग्रेसचा फक्त एकच खासदार निवडून आला होता. चंद्रपूरचे बाळू धानोरकर एेनवेळी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले व विजयी झाले होते. त्या तुलनेत यंदा ४ जागांवर विजयाची संधी या पक्षाला असल्याचे दिसते.

Loksabha election – BJP’s Mission 45 likely to fail in Maharashtra

मतांचे प्रमाण कोणाला किती Vote share in Maharashtra

२०१९ च्या निवडणुकीत ५०.८८ टक्के मतदान मिळवणाऱ्या महायुतीचा मतटक्का यंदा घटण्याची शक्यता सर्व्हेतून समोर आली. २०२४ च्या निवडणुकीत महायुतीची गाडी ४२.७ टक्क्यांवरच अडू शकते. गेल्यावेळी एकसंघ शिवसेनाचा भक्कम पाठिंबा भाजपला होता व भाजपचीही त्यांना भरघोस मदत झाली होती. त्यामुळे राज्यातील ५० टक्के मतदारांनी युतीला कौल दिला होता.

मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना यावेळी भाजपसोबत नाही. त्याएेवजी दोन फुटीर गटांची सोबत त्यांनी घेतली आहे. जनतेला हे पसंत नसल्याने २०१९ च्या तुलनेत महायुतीचे मतदान ८ टक्के घटण्याची शक्यता आहे.

२०१९ मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीला ३२.२४ टक्के मते मिळाली होती. यावेळी उद्धव ठाकरेंची पक्ष आघाडीसोबत असल्याने ४२.१ टक्क्यांपर्यंत त्यांचे मतदान वाढू शकते, असे अहवाल सांगतो. म्हणजे ठाकरेंमुळे तिकडे भाजपचे घटलेले ८ टक्के मतदान इकडे आघाडीकडे वळून त्यांचा १० टक्के वाढीव मतदानाचा फायदा होऊ शकतो.

इतर पक्षांना १५.१ टक्के मतदान मिळण्याचाही सर्व्हेचा अंदाज आहे.

वंचित आघाडी गणित बिघडवणार Vanchit Aghadi will spoil to MVA

प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांची वंचित आघाडी Vanchit Aghadi  महाविकास आघाडीत MVA  सहभागी होणार असल्याचे दावे केले जात आहेत. मात्र निवडणूक जाहीर होईपर्यंत तरी याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. उलट एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करण्यातच दोन्ही बाजूचे नेते गुंतले असल्याचे दिसून येते.

वंचित महाविकास आघाडीसोबत आली तर त्यांच्या मतदानात अजून वाढ होऊ शकते. मात्र त्यांची आघाडी झाली नाही तर मविआला मोठा फटका बसू शकतो. सुमारे १० ते १५ टक्के मते वंचित स्वतंत्रपणे घेऊन आघाडीच्य उमेदवारांचे गणित बदलवू शकते. पर्यायाने भाजपच्या नेतृत्वातील महायुतीला त्याचा फायदा होईल.