सर्वच पक्षांत ‘आयारामां’ना झटपट उमेदवारी, निष्ठावंतांची मात्र पुन्हा आश्वासनांवरच बोळवण

नीलेश लंके, राजू पारवे, आढळराव पाटील, धैर्यशील मोहिते, अर्चना पाटील, बजरंग सोनवणे, करण पवारांना उमेदवारीची लॉटरी

Loksabha election- Candidate immediately after changing political party

मुंबई : निवडणुका जाहीर झाल्या की या पक्षातून त्या पक्षात उड्या मारण्याचे प्रकार सुरु होतात. कोणताच पक्ष त्याला अपवाद राहिलेला नाही. उलट एेनवेळी पक्ष बदलणाऱ्याचाच उमेदवारीसाठी प्राधान्याने विचार केला जातो अन् ५ वर्षे उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या निष्ठावंतांच्या पदरी मात्र घोर निराशा येते. ‘पुढच्या वेळी बघू’ असे आश्वासन देऊन त्यांची फक्त बोळवणच केली जाते.

सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या वातावरणात अशाच काही आयाराम नेत्यांनी पक्षबदल करताच त्यांना झटपट उमेदवारीची लॉटरी लागली. किंबहुना उमेदवारी देण्याच्या बोलीवरच त्यांनी स्वपक्ष सोडून विरोधी पक्षात प्रवेश केला.

झटपट पक्षबदल, झटपट उमेदवारी

  • नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदारसंघात Ramtek loksaha शिंदेसेनेचे मावळते खासदार कृपाल तुमाने  यांच्याविरोधात वातावरण असल्याचा भाजपचा अहवाल होता. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उमेदवार बदलणे क्रमप्राप्त होते. मात्र तिथे त्यांच्या पक्षात दुसरा कुणीही सक्षम उमेदवार नव्हता. अखेर भाजपच्या सल्ल्याने काँग्रेसचे आमदार राजू पारवे Raju Parwe यांना शिंदेसेनेत घेऊन रामटेकची उमेदवारी बहाल करण्यात आली.
  • मराठवाड्यातील बीडमध्ये Beed Loksabha भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे Pankaja Munde यांना आव्हान देऊ शकेल असा तगडा उमेदवारच शरद पवार गटाकडे नव्हता. त्यामुळे अजित पवार गटात गेलेले बजरंग सोनवणे Bajrang Sonawane यांना पक्षात आणून शरद पवार यांनी लगेच उमेदवारी दिली. या पक्षातील वर्षभरापासून तयारी करणारे नरेंद्र काळे यांना डावलण्यात आले.
  • दक्षिण अहमदनगरमध्ये Ahmadnagar Loksabha डॉ. सुजय विखे पाटील Sujay vikhe यांच्याविरोधात लढण्यास पारनेरचे आमदार नीलेश लंके MLA Nilesh Lanke इच्छूक होते. पण ते गेले अजित पवारांच्या पक्षात. हा पक्ष महायुतीत असल्याने लंकेंना विखेंविरोधात लढता येत नव्हते. अखेर शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करुन त्यांनी विखेंविरोधात उमेदवारी मिळवली.
  • पुणे जिल्ह्यातील शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील Shivajirao Adhalrao Patil यांना शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेविरोधात सलग दुसऱ्या टर्मला निवडणूक लढवायची होती. आढळराव होते शिंदेसेनेत तर महायुतीत ही जागा सुटली अजित पवार गटाला. मग सोयीचा माग म्हणून आढळराव पाटलांनी अजित पवार गटात प्रवेश केला व कोल्हेंविरोधात त्यांना तातडीने उमेदवारी मिळाली.
  • सोलापूर जिल्ह्यातील माढ्यातील भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील Dhairyashil Mohite Patil यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला व त्यांनाही तातडीने माढ्याची उमेदवारी मिळाली. आता त्यांच्या पक्षप्रवेशाने माढ्यातील पवार गटाचे नेते अभय जगताप नाराज झाले आहेत.
  • धाराशिव लोकसभा मतदारसंघात उद्धव सेनेचे ओमराजे निंबाळकर खासदार आहेत. महायुतीत ही जागा अजित पवार गटाला मिळाली. पण या जिल्ह्यावर भाजपचे आमदार राणा जगजितसिंह यांचे वर्चस्व आहे. ओमराजेंशी त्यांचे भावकीचा वाद असून तेच एकमेकांना आव्हान देऊ शकतात. त्यामुळे महायुतीतील तडजोड म्हणून राणांच्या पत्नी अर्चना पाटील Archana Patil यांना अजित पवार गटात प्रवेश देऊन तातडीने उमेदवारीही देण्यात आली. अजितदादा गटाचे इच्छूक त्यामुळे नाराज झाले. विशेष म्हणजे राणा जगजितसिंह यांचे वडिल पदमसिंह पाटील हे अजित पवारांचे सख्खे मेहुणे व सुनेत्रा पवारांचे बंधू आहेत. नात्यागोत्याच्या या संबंधात निष्ठावंतांवर मात्र अन्यायच होत राहिला.
  • जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांना भाजपने यंदा तिकीट नाकारले. त्यामुळे पाटील, त्यांचे समर्थक पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार Karan Pawar- Jalgao Loksabha यांनी उद्धव सेनेत प्रवेश केला. लगेच करण पवार यांना ठाकरेंनी जळगाव लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. परिणामी उद्धव सेनेचे पदाधिकारी व इच्छूक मात्र नाराज झाले आहेत.
  • अमरावती मतदारसंघात भाजपने अपक्ष खासदार नवनीत राणा Navneeta Rana- Amarawati Loksabha यांना पक्षात घेऊन लगेच उमेदवारी जाहीर करुन टाकली. महायुतीचे मित्रपक्ष असलेले बच्चू कडू, आनंदराव अडसूळ यांचा राणा यांच्या नावाला तीव्र विरोध होता तरीही तो डावलून भाजपने राणांचेच नाव पुढे केले. त्यामुळे अमरावतीत महायुतीचे नेते राणांविरोधात मैदानात उतरले आहेत.
  • सांगली मतदारसंघात उद्धव सेनेने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील Chandrahar Patil- sangali Loksabha यांना पक्षात घेऊन तातडीने उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे काँग्रेस- उद्धव सेनेत खूप मोठे वादंग निर्माण झाले होते. पण दिल्लीपर्यंत वाद गेला तरी ठाकरेंनी ही जागा सोडली नाही. परिणामी काँग्रेसचे नेते विशाल पाटील हे आता बंडखोरीच्या तयारीत आहेत.
  • वर्धा जिल्ह्यातील माजी आमदार अमर काळे Amar Kale- Wardha Loksabha यांना शरद पवार यांनी काँग्रेसमधून आपल्या पक्षात आणले व वर्धा मतदारसंघात लगेचच उमेदवारीही दिली.

याशिवाय काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण Ashok Chavan, माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा Milind Deora यांनी अलिकडेच अनुक्रमे भाजप व शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यांना लगेचच दुसऱ्या दिवशी राज्यसभेवर संधी देण्यात आली.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics