अखेर माढ्यात शरद पवारांनी डाव टाकला; धैर्यशील मोहिते पाटीलच भाजपविरोधात लढणार

मोहितेंच्या घरवापसीचा सोलापूर मतदारसंघात प्रणिती शिंदे यांनाही फायदा होण्याची शक्यता

Madha Loksabha-Mohite Patil enters in Sharad Pawar’s NCP
सोलापूर :
माढ्यातील भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर MP Ranjeetsingh Naik Nimbalkar यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध करुनही पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली नाही. त्यामुळे अखेर ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील Vijaysingh Mohite Patil यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील Dahryashil Mohite Patil यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करुन माढ्यातून उमेदवारी मिळवली. आता निंबाळकर विरुद्ध मोहिते असा चुरशीचा सामना होईल. मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादीत घरवापसीमुळे महाविकास आघाडीला बळ मिळाले असून सोलापूरात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे Praniti Sushilkumar Shinde यांनाही त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसमधून आलेल्या निंबाळकरांना २०१९ मध्येही भाजपने उमेदवारी दिली होती, तेव्हाही मोहिते पाटील यांनी त्यांना विरोध केला होता. मात्र तेव्हाही भाजप श्रेष्ठींनी त्यांचे एेकले नाही. २०२४ च्या निवडणुकांचे वातावरण तयार होताच मोहित पाटलांनी पुन्हा निंबाळकरविरोधी सूर आळवायला सुरुवात केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन भाजपने पुन्हा निंबाळकरांचीच उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे पक्षात आपल्या शब्दाला किंमत नसल्याची भावना मोहिते पाटलांमध्ये निर्माण झाली.

महिनाभरापासून खदखद 

एक महिन्यांपासून मोहिते पाटील व निंबाळकरांमधील हे शीतयुद्ध Nimbalkar Mohite Controversy सुरू होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांनी त्यात मध्यस्थी करुन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, पण निंबाळकरांची उमेदवारी मागे घेतली तरच वाद मिटेल, या भूमिकेवर मोहिते पाटील आग्रही होते. अन् विद्यमान खासदाराची जाहीर झालेली उमेदवारी रद्द करणे भाजपला अमान्य होते. त्यामुळे या वादावर तोडगा निघू शकला नाही.

शरद पवार Sharad Pawar यांचे या घडमोडींवर बारकाईने लक्ष होते. ही संधी साधून त्यांनी पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचेच नेते असलेल्या विजयसिंह मोहिते पाटील व त्यांच्या घराण्याला पुन्हा आपल्या पक्षात आणण्यासाठी गळ टाकला. विजयसिंह यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील Dahryashil Mohite Patil यांना खासदारकी लढवायचीच असल्याने त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला. १४ एप्रिल रोजी धैर्यशील यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झाला व लगोलग त्यांची उमेदवारीही जाहीर झाली. १६ एप्रिल रोजी ते अर्ज भरणार आहेत.

बारामतीतही होईल फायदा

शरद पवार sharad Pawar, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे Sushilkumar Shinde, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील Vijaysingh Mohite Patil यांच्यात १४ एप्रिल रोजी अकलूजला मोहितेंच्या घरी आधी बंदद्वार चर्चा झाली. त्यात सोलापूर, सातारा, पुणे जिल्ह्यांतील जागांबाबत रणनिती ठरवण्यात आली. ‘आमच्या एकत्र येण्याचा माढा, सोलापूर आणि बारामती मतदारसंघावरही परिणाम होईल. या बैठकीचा संदेश संपूर्ण राज्यभर जाणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा परिणाम होईल,’असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics