शिंदेसेनेच्या पहिल्या यादीत ७ खासदारांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री पूत्र श्रीकांत शिंदेला मात्र स्थान मिळाले नाही

भाजपने कल्याणच्या जागेसाठी दबाव वाढवल्यामुळे एकनाथ शिंदेंना निर्णय घेण्यात अडचणी

Shrikant Shinde has no place in the first list
मुंबई : भाजपच्या दबावामुळे अडकलेली एकनाथ शिंदे Eknath Shinde’s Shiv sena यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी अखेर जाहीर झाली. या यादीत ८ उमेदवारांची नावे असून त्यात ७ विद्यमान खासदारांचा समावेश आहे, हे विशेष. भाजपने कितीही उमेदवार बदलाचा आग्रह केला असला तरी बंडात आपल्याला साथ देणाऱ्या ७ खासदारांना शिंदेंनी पुन्हा हट्टाने तिकीटे दिली.फक्त रामटेकमध्ये कृपाल तुमाने यांचे तिकीट कापून काँग्रेसमधून आलेले राजू पारवे यांना संधी देण्यात आली.  मात्र स्वत:चा मुलगा व कल्याणमधील खासदार श्रीकांत शिंदे MP Srikant Shinde यांच्या नावाला मात्र शिंदे पहिल्या यादीत स्थान देऊ शकले नाहीत.

उद्धव ठाकरेंशी udhav thackeray बंड करुन जेव्हा एकनाथ शिंदेंनी Eknath Shinde भाजपशी हातमिळवणी केव्हा तेव्हा त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार व १३ खासदार आले. एवढा मोठा धोका पत्कारुन शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या या सर्व लोकप्रतिनिधींना त्यांचे मानाचे स्थान पुन्हा मिळवून देणे ही शिंदेंवर नैतिक जबाबदारीच होती. त्यामुळे जेव्हापासून लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा सुरु झाली तेव्हापासून एकनाथ शिंदे Eknath Shinde आपल्या १३ विद्यमान खासदारांच्या जागांसाठी अतिशय आग्रही आहेत. यापैकी काही जागा भाजपला हव्या आहेत. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी अंतर्गत सर्व्हेचे कारण पुढे करुन तुमच्या काही खासदारांविषयी जनतेत तीव्र नाराजी असल्याचे सांगितले. किमान ५ खासदार तरी बदलावे लागतील, असे सांगून शिंदेंवर दबावाचे राजकारण सुरु केले. मात्र शिंदे त्यांच्यासमोर झुकले नाहीत. अडचणीच्या काळात माझ्यासोबत राहिलेल्या लोकांना त्यांचे पद पुन्हा मिळवून देणे ही माझी जबाबदारी आहे, असे त्यांनी भाजपला सुनावले. म्हणूनच पहिल्या यादीतील ८ उमेदवारात ७ खासदारांची नावे घेण्यात ते यशस्वी ठरले. इथे शिंदेनी जागावाटपातील पहिल लढाई जिंकली असे मानले जाते.

नाशिक, कल्याण, ठाण्याचा वाद Contravercy on Nashik, kalyan, Thane

शिंदेंचे विद्यमान खासदार असलेल्या नाशिक, कल्याण, ठाणे, मुंबईतील ३ मतदारसंघ, यवतमाळ- वाशिम, रत्नागिरी या मतदारसंघाचा तिढा मात्र अजून सुटलेला नाही.

  • नाशिकमध्ये शिंदेसेनेचे हेमंत गोडसे Hemant Godse हे खासदार आहेत. या जागेवर आधी भाजपने दावा केला होता. आता अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ Changan Bhujbal हेही आग्रही आहेत. ही जागा भुजबळांना सुटण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र गोडसे यांनी जागा वाचवण्यासाठी मुंबईत तळ ठोकला आहे. ही जागा वाचवण्यात शिंदेंना यश येते का? हे पाहावे लागेल.
  • यवतमाळ- वाशिममध्ये भावना गवळी Bhavna Gawali यांच्याविरोधात वातावरण असल्याचा भाजपचा अहवाल आहे. मात्र या जागेवर बदल करण्यास शिंदे इच्छूक नाहीत. फारच वेळ आली तर गवळी यांना बदलून आपल्या पक्षाचे आमदार संजय राठोड यांना लोकसभेला उभे करायचे व गवळी यांना विधानसभेत पाठवायचे अशी त्यांची रणनीती आहे. मात्र काहीही झाले तरी हा मतदारसंघ शिंदेसेनेकडेच ठेवायचा ही खूणगाठ शिंदेंनी बांधलेली आहे.
  • रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात सध्या शिवसेनेचे विनायक राऊत Vinayak Raut खासदार आहेत. पण ते ठाकरे गटात आहेत. युतीत ही जागा वर्षानुवर्षे शिवसेनेकडेच आहे. त्यामुळे शिंदेसेनेचे नेते उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचा इथे दावा आहे. पण माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेNarayan Rane यांनी भाजपला जागा मिळावी म्हणून प्रयत्न सुरु केले आहेत. राणेंच्या या प्रयत्नांना यश येत असल्याचे संकेत मिळत आहेत. तरीही ही जागा शिंदेसेनेकडेच राहावी, यासाठी शेवटपर्यंत लढाई सुरु आहे.
  • मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरची जागाही वर्षानुवर्षे शिवसेनेकडे आहे. गेल्यावेळी मात्र इथे एमआयमचा खासदार निवडून आला. मात्र तरीही या जागेवर शिवसेनेचाच म्हणजे महायुतीत शिंदेसेनेचा दावा आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ हवा आहे. स्वत: अमित शाह Amit Shah यांनी इथे सभा घेऊन ‘संभाजीनगरातून मोदींना कमळ पाठवा’ अशी हाक दिली आहे. दोन्ही गटांनी ही जागा प्रतिष्ठेची केल्यामुळे अद्याप शिंदे या जागेविषयी निर्णय घेऊ शकलेले नाहीत.

Shrikant Shinde has no place in the first list

मुख्यमंत्री पूत्राला भाजपचा विरोध BJP’s opposition to Chief Minister’s son

एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे Shrikant Shinde हे कल्याणचे खासदार आहेत. मुख्यमंत्र्यांचेच पूत्र असल्यामुळे त्यांची उमेदवारी पक्की मानली जाते. पण विद्यमान खासदार असूनही  शिंदेसेनेच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव न आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

कल्याणमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून भाजपने दावा केला आहे. तेथील कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण Minister Ravindra Chavan यांच्यासह काही नेत्यांनी यावेळी श्रीकांत शिंदेंच्या नावाला विरोध केल्याने भाजप- शिंदेसेनेत तणावाचे वातावरण आहे. त्यातच मध्यंतरी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह तिघांवर पोलिस ठाण्यात गोळीबार केल्याने हा तणाव अधिक वाढला. दोन्ही गट एकमेकांना धडा शिकवण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत श्रीकांत यांच्यासाठी कल्याण हा मतदारसंघ पूर्वीसारखा सुरक्षित राहिलेला नाही. त्यामुळे कल्याण भाजपला देऊन श्रीकांत यांना ठाण्यातून उभे करायचे का? याबाबतही मुख्यमंत्री चाचपणी करत आहेत.

कल्याण भाजपला देण्याची तयारी shiv sean ready to give Kalyan to BJP

शिंदे यांच्यासाठी ठाणे हा बालेकिल्ला मानला जातो. तेथून श्रीकांत यांना निवडून आणणे कल्याणपेक्षा सोपे आहे, असे शिंदेंना वाटते. तसेच कल्याण भाजपला देऊन त्यांची नाराजीही दूर केली जाऊ शकते. यावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चेचा खल सुरु असल्याने पहिल्या यादीत श्रीकांत यांचे नाव येऊ शकले नाही, असे शिंदेसेनेतील एका नेत्याचे म्हणणे आहे.

हे आहेत शिंदेसेनेचे ८ उमेदवार

  • दक्षिण मध्य मुंबई- राहूल शेवाळे
  • कोल्हापूर- संजय मंडलिक
  • शिर्डी- सदाशिव लोखंडे
  • बुलडाणा- प्रताप जाधव
  • हिंगोली- हेमंत पाटील
  • हातकणंगले- धैर्यशील माने
  • मावळ- श्रीरंग बारणे
  • रामटेक- राजू पारवे 
Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics