मोदींच्या दौऱ्यापूर्वी यवतमाळमध्ये शिंदेसेनेचे संजय राठोड- भावना गवळींची गटबाजी उघड

यवतमाळ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi today in yavatmal) यांची २८ फेब्रुवारी रोजी यवतमाळमध्ये जाहीर सभा होत आहे. यानिमित्ताने भाजपने जय्यत तयारी केली आहे. मात्र महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदेसेनेतील पालकमंत्री संजय राठोड (Minister Sanjay Rathod) व स्थानिक खासदार भावना गवळी (MP Bhawana Gavali) या एकाच पक्षातील दोन नेत्यांमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. मोदींच्या स्वागतासाठी या दोन्ही नेत्यांनी लावलेल्या बॅनरवर परस्परांचे फोटो लावणे टाळले आहे.

यवतमाळ- वाशिम हा दोन जिल्ह्यांचा मिळून एक लोकसभा मतदारसंघ आहे. युतीत गेल्या अनेक वर्षांपासून हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. शिवसेनेच्याच भावना गवळी Bhawana Gavali येथील विद्यमान खासदार आहेत. मात्र आता ही जागा आपल्याला मिळावी यासाठी पालकमंत्री संजय राठोड Sanjay Rathod हे प्रयत्नशील आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर राठोड व गवळी या दोघांनीही शिंदे गटासोबत राहणे पसंत केले होते. त्याचे बक्षीस म्हणून राठोड यांना मंत्रिपद मिळाले. त्यामुळे आता लोकसभेची उमेदवारी आपल्यालाच मिळावी, असा गवळी यांचा आग्रह आहे. त्यामुळे या दोघांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून शितयुद्ध घडत आहे, त्याचे दर्शन मोदींच्या दौऱ्याच्या निमित्ताने पुन्हा झाले.

गवळींमागे ईडीचा ससेमिरा, राठोड तरुणीच्या मृत्यूप्रकरणी वादात

उद्धव ठाकरेंच्या (Udhav Thackeray’s Shivsena) शिवसेनेत असताना भावना गवळी यांच्यावर ईडीचे गुन्हे दाखल झाले आहेत. पथकाकडून त्यांची चौकशीही झाली. मात्र आता त्या शिंदे गटात व भाजपशी युतीत असल्याने ही चौकशी थंड बस्त्यात गेली आहे. मात्र त्याची टांगती तलवार गवळी यांच्या डोक्यावर आहेच. मविआचे सरकार असताना मंत्रिपदी असलेले संजय राठोड हे एका तरुणीच्या मृत्यूप्रकरणी अडचणीत आले होते. तेव्हा भाजप नेत्या चित्रा वाघ (Bjp leader Chitra Wagh) यांनी राठोड विरोधात रान पेटवले होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांची मंत्रिपदावरुन हकालपट्टीही केली होती. नंतर राठोड शिंदेगटात आले व भाजपच्याच सत्तेत त्यांना पुन्हा सन्मानाने मंत्रिपदही मिळाले. कालांतराने तरुणीच्या मृत्यूप्रकरणात त्यांना क्लीनचिटही मिळाली. मात्र हे प्रकरण पुन्हा डोके वर काढण्याची त्यांनाही भीती आहेच.

शिंदेंची डोकेदुखी वाढली  headache For Cm Eknath Shinde

खासदार भावना गवळी Bhawana Gavali व मंत्री संजय राठोड Sanjay Rathod यांच्यातील अंतर्गत वादामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांची डोकेदुखी वाढली आहे. यावेळी विधानसभेला जिंकणे अवघड वाटत असल्याने राठोड यांना ‘मोदी लाटे’च्या आधारावर खासदार व्हायचे आहे. तर गवळी यांना पुन्हा खासदारकी हवी आहे. यापैकी कोणाला तिकिट द्यावे व दुसऱ्याची नाराजी कशी दूर करावी? हा प्रश्न सध्या शिंदेंसमोर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics