बारामती म्हणजे पवारांचा सातबारा नाही म्हणत शिंदेसेनेच्या विजय शिवतारेंनी केली लोकसभेच्या मैदानात उतरण्याची घोषणा

Vijay Shivtare's challenge to Pawar in Baramati Lok Sabha अजित पवारांनी २०१९ मध्ये पराभूत केल्याचा वचपा काढण्यासाठी थोपटले दंड

Vijay Shivtare’s challenge to Pawar in Baramati Lok Sabha
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आजतागायत शरद पवार यांच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात यावेळी पवारांची कन्या व विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या उमेदवारी दाखल करणार आहेत. घरातूनच आव्हान मिळाल्यामुळे दस्तुरखुद्द शरद पवार (Sharad Pawar) व सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. मात्र या संभाव्य लढतीत अजून एक ट्विस्ट आला आहे. पुरंदरचे माजी आमदार व शिंदेंच्या शिवसेनेचे नेते विजयबापू शिवतारे (Vijay Shivtare) यांनीही तिसरा उमेदवार म्हणून बारामतीत लढण्याची घोषणा केली आहे.

विजय शिवतारे (Vijay Shivtare)  व अजित पवार (Ajit Pawar) यांचे राजकीय वैर सर्वश्रूत आहे. पूर्वी राष्ट्रवादीत असलेले शिवतारे अजित पवारांच्या दादागिरीला कंटाळून शिवसेनेत आले होते.  २००९ व २०१४ च्या निवडणुकीत पुरंदर मतदारसंघातून ते विजयी झाले होते. दरम्यानच्या काळात त्यांनी अजित पवार व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली होती. ही टीका जिव्हारी लागल्यामुळे अजित पवार यांनी २०१९ च्या निवडणुकीत शिवतारे यांना पराभूत करण्याचा विडाच उचलला होता.

अजित पवारांनी दिली होती धमकी Ajit Pawar  given threat to Vijay Shivtare

‘तुला यंदा दाखवतो तु कसा आमदार होतो ते. महाराष्ट्राला माहितीय मी जर ठरवलं एखाद्याला आमदार होऊ द्यायचे नाही तर मी कुणाच्या बापाला ऐकत नाही,’ असा जाहीर इशारा अजितदादांनी तेव्हा दिला होता आणि तो खराही करुन दाखवला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुरंदर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांच्या पाठीमागे अजित पवार यांनी ताकद उभी केली, त्यामुळे शिवसेनेचे विजय शिवतारे यांचा पराभव झाला होता. तो शिवतारेंच्या खूप जिव्हारी लागला. शिवसेनेत फुटीनंतर शिवतारे शिंदे गटासोबत गेले. आता बारामतीत दोन्ही पवारांमध्ये लढाई होत असताना त्यांनीही या लढाईत उडी घेण्याची घोषणा केली आहे.

Vijay Shivtare’s challenge to Pawar in Baramati Lok Sabha

शिवतारेंचे गणित काय?  Calculation of votes by Shivtar

बारामती मतदारसंघ काही पवारांचा सातबारा नाही. या मतदारसंघात फक्त बारामतीचाच नेता निवडून यावा असा नियम नाही. भोर, पुरंदर येथील उमेदवारही येथून निवडून येऊ शकतो. गेल्या निवडणुकीचा विचार केला तर पवारांच्या बाजूने ६ लाख ८३ हजार मते आहेत. तर पवारांच्या विरोधात ५ लाख ८० हजार मते आहेत. यावेळी ६ लाख ८३ हजार मतांचे दोन्ही पवारांमध्ये विभाजन होईल. मात्र पवारविरोधी ५ लाख ८० हजार मते एकगठ्ठा राहिली तर आपला उमेदवार विजयी होऊ शकतो.

अजित पवारांकडून जनतेचा अपमान Ajit Pawar insulted public

‘२०१९ मध्ये अजित पवार यांनी सासवडमधील पालखीतळावर येऊन विजय शिवतारेंचा अपमान केला नसून तो पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा अपमान केला होता. त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे.  म्हणूनच आता गुलामगिरी करणार नसून आरपारची लढाई करणार असल्याची घोषणा शिवतारे यांनी केली.

अजितदादांच्या अडचणी वाढणार Ajitdad’s problems will increase

विजय शिवतारे हे सध्या शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष व शिंदेंची शिवसेना महायुतीत आहे. मात्र पुरंदर मतदारसंघात पक्षापेक्षा शिवतारे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शिवतारे उभे राहिल्यास ते शिवसेनेची मते घेऊ शकतात. तसेच बारामतीत पवार काका- पुतण्याला वर्षानुवर्षे विरोध करणारे अनेक मतदार आहेत. भाजपने सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला तरी हा संपूर्ण मतदार त्यांना मतदान करेल असे नाही. शिवतारेंच्या रुपाने त्यांना तिसरा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. एकूणच शिवतारे मैदानात उतरल्यास बारामतीत तिरंगी लढत होईल. त्याचा फटका अजित पवारांना बसून अप्रत्यक्ष फायदा सुप्रिया सुळे यांना होऊ शकतो.

Vijay Shivtare’s challenge to Pawar in Baramati Lok Sabha

हर्षवर्धन पाटीलही दादांच्या विरोधात Harshvardhan Patil also against Dada

दुसरीकडे, बारामती लोकसभेत समाविष्ट असलेल्या इंदापूरमधूनही भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी अजितदादांविरोधी सूर आळवला आहे. अजितदादांचे समर्थक दत्ता भरणे यांना इंदापुरातून दोनदा हर्षवर्धन पाटील यांना पराभूत केले होते. आता भरणे समर्थक गुंडगिरीची भाषा करु लागले आहेत, अश तक्रार नुकतीच पाटील यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती. म्हणजे इंदापूरमधूनही भाजप व हर्षवर्धन पाटील यांचे पाठबळ अजितदादांना मिळणार नाही. ही दादाविरोधी मते थेट सुप्रिया सुळे यांना मिळाली नाही तरी शिवतारे यांच्याकडे जाऊ शकतात. अजितदादांची डोकेदुखी त्यामुळे वाढू शकते. आता शिवतारे यांना शांत करण्यासाठी अजित पवारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे धाव घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

मतविभाजनासाठी शरद पवारांचा डाव Sharad Pawar’s ploy to divide votes

Baramati Loksabha- Supriya Sule V/s Sunetra Ajit Pawar,  सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांची थेट लढत झाली तर सुप्रिया सुळे यांच्या पराभवाची भीती शरद पवारांना वाटते. कारण गेल्या काही वर्षात शरद पवार राष्ट्रीय राजकारणात गेल्यापासून अजित पवार यांनी बारामती मतदारसंघावर चांगले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नुकत्याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बारामतीत एक शासकीय कार्यक्रम घेऊन अजितदादांनी शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत याची चुणूक दाखवून दिली होती. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत अजितदादांशी थेट लढण्यापेक्षा तिहेरी, चौरंगी लढत घडवून आणण्यावर शरद पवारांचा जोर असेल असे राजकीय विश्लेषकांना वाटते. म्हणूनच बारामती लोकसभा मतदारसंघातील अजित पवारांचे जे राजकीय विरोधक नेते आहेत त्यांना प्रोत्साहन देऊन वेगळे उमेदवार उभे करण्याची रणनीती आखली जात आहे. हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे यांच्यासारखे अजितदादाविरोधक नेते एकत्र आणून तिसरा सक्षम उमेदवार दिल्यास अजित पवारांकडे जाणारी महायुतीची मते फुटू शकतात व त्याचा सुप्रिया यांना फायदा होऊ शकतो, अशी रणनिती त्यामागे असल्याचे सांगितले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics