अयोध्येचे निमंत्रण नाही, मात्र पवार जाणार; पण २२ जानेवारीला नव्हे
पुणे : अयोध्येत २२ जानेवारी रोजी हाेणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहण्यास काँग्रेस नेत्यांनी नकार दिल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांना पत्रकारांनी विचारणा केली असता ते म्हणाले, ‘अयोध्येतील श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, मला त्याचे आमंत्रण आलेले नाही. पण तरीही मी तिथे जाणार आहे. पण २२ जानेवारीला नव्हे तर इतर वेळी नक्की जाईल.’
Congress leaders are being criticized for refusing to attend the Shri Ram Murthy Pranpratistha ceremony to be held on January 22 in Ayodhya. When Sharad Pawar was asked by journalists in this background, he said, ‘The idol of Shri Ram in Ayodhya is going to be consecrated, I have not received an invitation for it. But I’m going there anyway. But not on January 22, but at another time for sure.’
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व सोनिया गांधी यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या इव्हेंटचे भाजप राजकारण करत असल्याचा आरोप करत २२ जानेवारीला अयोध्येला जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे काँग्रेसवर चोहोबाजूने टीका झाली होती. मात्र ‘कोणी अयोध्येला गेला नाही तर त्या व्यक्तीला श्रीरामांबद्दल आस्था नाही, असा अर्थ काढणे चुकीचे आहे,’ असे सांगत पवार यांनी काँग्रेसच्या निर्णयाची एकप्रकारे पाठराखणच केली.
अयोध्येला जाणाऱ्या विमानाच्या तिकिटात भरमसाठ वाढ केलेली आहे. १० हजारांचे ४० चाळीस हजार करण्यात आलेत. विमानसेवा अशी महागली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
Congress president Mallikarjun Kharge and Sonia Gandhi had refused to go to Ayodhya on January 22, alleging that the BJP was politicizing the Pranapratistha event. Because of this, Congress was criticized from all sides. However, Pawar supported the decision of the Congress by saying that ‘If someone has not been to Ayodhya, it is wrong to interpret that person as not interested in Shri Ram.’ The flight ticket to Ayodhya has increased drastically. 40 of 10 thousand has been converted into 40 thousand. He also pointed out that aviation is expensive.
घराणेशाहीचे समर्थन
घराणेशाहीच्या मुद्द्यावर शरद पवार म्हणाले, ‘राजकारणात घराणेशाही आलीये, ती मोडीत काढायलाच हवी. आता घराणेशाही म्हणजे नेमकं काय? डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, व्यापाऱ्यांचा मुलगा व्यापारी आणि शेतकऱ्यांचा मुलगा शेतकरी होतो, मग राजकारण्यांचा मुलगा राजकारणात आला तर ही कशी काय घराणेशाही झाली? त्यामुळे पंतप्रधानांनी घराणेशाहीबाबत बोलणे योग्य नाही. त्यांनी मूलभूत प्रश्नांवर बोलायला हवे’, असा टोला शरद पवार यांनी लगावला. १२ जानेवारी रोजी नाशिकच्या मेळाव्यात पंतप्रधान मोदी यांनी ‘घराणेशाही संपवण्यासाठी युवकांनी राजकारणात यावे,’ असे आवाहन केले होते. त्याला पवारांनी प्रत्त्युत्तर दिले.
On the issue of dynasticism, Sharad Pawar said, ‘Dynasticism has come into politics, it must be destroyed. Now what exactly is nepotism? A doctor’s son becomes a doctor, a businessman’s son becomes a businessman and a farmer’s son becomes a farmer, then if a politician’s son enters politics, how does this become a dynasty? Therefore, it is not appropriate for the Prime Minister to talk about dynasticism. Sharad Pawar said that they should talk about basic issues. On January 12, Prime Minister Modi had appealed to ‘youths to enter politics to end dynasticism’ at a gathering in Nashik. Pawar replied to him.