काँग्रेसचा २१ + १८ + ६ चा फॉर्म्युला उद्धव ठाकरे, शरद पवारांना अमान्य

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला (congress) २१, उद्धव सेनेला (Ubt) १८ आणि राष्ट्रवादीला (Ncp) फक्त ६ आणि वंचित आघाडी व राजू शेट्टी यांच्या पक्षाला अनुक्रमे २ आणि १ असे जागावाटप करावे, असा फॉर्म्युला काँग्रेसच्या समितीने आपल्या हायकमांडकडे सादर केला असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ४ जानेवारी रोजी प्रकाशित केले आहे. या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी आजच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीत बैठकही होत आहे. मात्र महाराष्ट्रात सध्या एकही खासदार नसलेल्या काँग्रेसने आघाडीत स्वत:ला ‘मोठा भाऊ’ कसे काय मानले? असा प्रश्न विचारत उद्धव सेना व राष्ट्रवादीचा शरद पवार गट यांना त्यांचा प्रस्ताव अमान्य असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तत्कालिन शिवसेना व आताच्या उद्धव सेनेने भाजप सोबत युतीत २०१९ मध्ये २३ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी १८ खासदार निवडून आले होते. त्यामुळे यंदाही आम्हाला २३ जागाच मिळाव्यात, असा दावा या पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केला होता. त्यावरुन काँग्रेसन नेते व राऊत यांच्यात वाक‌्युद्धही रंगले होते. सध्या शिवसेनेत फूट पडल्याने त्यांची ताकद कमी झाली आहे. मात्र अजूनही महाराष्ट्रात उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्या बाजूने सहानुभूती असल्याचे अनेक संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे(Udhav Thackeray) हेच नेतृत्व असेल व त्यांच्या पक्षाला इतर दोन मित्रपक्षांपेक्षा जास्त जागा मिळायला हव्यात, अशी अपेक्षा या पक्षाच्या नेत्यांमधून व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीत बिघाडी होईल, अशी कोणतीही कृती मी करणार नाही असे उद्धव ठाकरेंनी म्हटले असले तरी तरी आघाडीत दुय्यम स्थान तेही स्वीकारणार नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या काही नेत्यांनी दिलेला हा फॉर्म्युला उद्धव सेना कदापिही स्वीकारणार नाही. आपल्या २३ जागांच्या दाव्यात काही तडजोड ते निश्चित करतील, मात्र आघाडीत सर्वाधिक जागांचा वाटा हा उद्धव ठाकरेंचाच (Udhav Thackeray) राहिल, अशी परिस्थिती आहे. २०१९ मध्ये शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते. बंडानंतर त्यातील १३ जण शिंदे सोबत गेले तर ठाकरेंसोबत अजून ५ खासदार अाहेत. ही संख्या राष्ट्रवादी व काँग्रेसपेक्षा जास्तच आहे.

फुटीनंतरही राष्ट्रवादीकडे जास्त खासदार

शरद पवार (sharad pawar) यांच्या राष्ट्रवादी पक्षाने २०१९ मध्ये काँग्रेस सोबतच्या आघाडीत २२ जागा लढवल्या होत्या. या आघाडीत लोकसभेसाठी काँग्रेस नेहमीच मोठा भाऊ राहिला अाहे. गेल्या वेळी काँग्रेसने २६ जागा लढवल्या होत्या, मात्र त्यापैकी फक्त चंद्रपूरला त्यांचा एक खासदार बाळू धानोरकर हे निवडून आले होते. मात्र त्यांचेही काही दिवसांपूर्वी निधन झाले, त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसचा लोकसभेचा एकही खासदार सध्या तरी नाही. तर राष्ट्रवादीचे ४ खासदार निवडून आले होते. त्यापैकी ३ सध्या शरद पवारांसोबत (sharad pawar) आहेत व एक अजितदादा गटात (ajit pawar) गेला आहे.

राष्ट्रवादी इतकी तडजोड करणार नाही

राष्ट्रवादीतील बंडामुळे शरद पवारांची (sharad pawar) ताकद काहीशी कमी झालेली असली तरी फूटीनंतरही त्यांच्याकडे काँग्रेसपेक्षा जास्त खासदार आहेत. त्यामुळे त्यांचा पक्ष जागावाटपात एक आकडी संख्या (६) कधीही स्वीकारणार नाहीत. सद्यपरिस्थितीचा विचार करुन राष्ट्रवादीने आधीच तडजोड करत गतवेळपेक्षा निम्म्या म्हणजे १२ जागा मागितल्या आहेत. त्यातही अजून ५० % कपात करण्यास त्यांचा पक्ष कदापिही तयार होणार नाही.
उलट एकही खासदार नसलेल्या काँग्रेसला २१ जागा द्यायच्या कोणत्या निकषावर असाच प्रश्न या दोन्ही मित्रपक्षांकडून विचारला जात आहे.
म्हणूनच प्राप्त परिस्थितीत काँग्रेसच्या एका समितीने दिलेला फॉर्म्युला उद्धव सेना व शरद पवार गट कधीही मान्य करणार नाहीत असेच दिसते.