मुंबई : ‘श्रीराम मांसाहारी होते’ असे वक्तव्य करुन आपल्या अकलेचे तारे तोडणारे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra ahwad) यांच्याविरोधात भाजप व हिंदुत्ववादी संघटनांनी रान पेटवल्यानंतर मात्र आव्हाड ताळ्यावर आले आहेत. आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागताना आव्हाड म्हणाले, ‘”मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचं विकृतीकरण करणे हे माझे काम नाही. काल शिर्डीतील शिबिरात मी जे काही बोललो ते बोलण्याच्या ओघात बोलून गेलो. हा वाद मला वाढवायचा नाही. प्रभू श्रीराम आमच्यासाठी पांडूरंग आहेत. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो.’
वाल्मिकी रामायण वाचा
विरोधकांना उद्देशून आव्हाड (jitendra ahwad) म्हणाले, ‘वाल्मिकी रामायणामध्ये सहा स्कंद आहेत. त्यातील अयोध्ये स्कंदेतील 52 श्लोक 102 जो आहे तो मी वाचून दाखवत नाही, कारण मला वाद वाढवायचा नाही.
1891 मध्ये पश्चिम बंगालमध्ये एक डॉक्युमेंट प्रकाशित झाले आहे. तेही मी खवणार नाही.ज्यांना वाचायचं आहे त्यांना मी कॉपी देतो. मला भारतातील अनेक आयआयटीमधील विद्यार्थ्यांनी पेपर्स पाठवले. त्या त्या काळात कसे ट्रान्सलेशन केलं गेलं. वाल्मिकी रामायणात जे लिहिलं असेल त्यामध्ये कोणाचा आक्षेप आहे का, त्यावर बोलावं”, असे प्रतिआव्हान त्यांनी विरोधकांना दिले.
मी अभ्यासाशिवाय बोलत नाही
अन्न पुराणी नावाचा पिक्चर आला आहे. त्यामध्ये त्यांनी वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणातील श्लोक म्हणून दाखवला आहे. मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही. पण आजकाल अभ्यासाला महत्व नाही, भावनांना महत्व आहे, असा टोला आव्हाड (jitendra ahwad) यांनी लगावला.